Uniform News esakal
महाराष्ट्र बातम्या

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश! सोलापूरच्या 3100 महिला शिवणार सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचे गणवेश; शासनाकडून ‘मआविम’ला मिळणार कापड

यंदा प्रथमच निधीऐवजी महिला आर्थिक विकास महामंडळाला थेट कापड देऊन गणवेशाची शिलाई होणार आहेत. जिल्ह्यातील ‘मआविम’कडील बचत गटांमधील सुमारे तीन हजार १०० महिला १५ दिवसांत गणवेश शिवणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्याचे नियोजन आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन गणवेश मिळणार आहेत. यंदा प्रथमच निधीऐवजी महिला आर्थिक विकास महामंडळाला (मआविम) थेट कापड देऊन गणवेशाची शिलाई होणार आहेत. जिल्ह्यातील ‘मआविम’कडील बचत गटांमधील सुमारे तीन हजार १०० महिला १५ दिवसांत गणवेश शिवणार आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना एक गणवेश देण्याचे नियोजन आहे.

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील दोन लाख २० हजार विद्यार्थ्यांना २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षात प्रत्येकी दोन गणवेश दिले जाणार आहेत. त्यात एक स्काऊट गाइडचा तर दुसरा नेहमीचाच गणवेश असणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नव्या निर्णयानुसार बचत गटांमधील महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे. एक गणवेश शिलाई केल्यावर १२० रुपये मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात महिला आर्थिक विकास महामंडळाकडील तीन हजार १०० महिलांकडे जिल्ह्यातील सव्वादोन लाख गणवेश शिलाईचे काम येणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा दुसऱ्या गणवेशासाठी कापड येणार आहे. विशेष बाब म्हणजे यंदा विद्यार्थ्यांच्या अंदाजित मापानुसार राज्य स्तरावरूनच कटिंग केलेले कापड ‘मआविम’ला पाठविले जाणार आहे.

दररोज १५ हजार गणवेशाची शिलाई

दोन दिवसांपूर्वी ‘मआविम’च्या अधिकाऱ्यांसमवेत शालेय शिक्षण विभागाची ऑनलाइन बैठक पार पडली. त्यात चार-पाच दिवसांत विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे कापड येईल, असे सांगण्यात आले आहे. कटिंग करून आलेल्या कापडावरून जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचत गटांमधील एकतीसशे महिला दररोज १५ हजार गणवेशाची शिलाई करू शकतात, अशी माहिती जिल्हा समन्वयक सोमनाथ लामगुंडे यांनी दिली. जिल्ह्यातील दोन ते सव्वादोन लाख विद्यार्थ्यांचा प्रत्येकी एक गणवेश १५ दिवसांत शिवून पूर्ण होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gajabhau X Account: 'गजा भाऊ' अकाउंट डिलीट होणार? देवेंद्र फडणवीसांशी संबंधित प्रकरण काय? महाराष्ट्र पोलिसांची X ला नोटीस

Praful Patel : ‘तो’ निर्णय सुनेत्रा पवारांचा; प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत केले स्पष्ट

Pankaja Munde : राजकारणात बोलताना पथ्य पाळायला हवे

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात दारूची अवैध वाहतूक करवीर पोलिसांनी रोखली

महापौर पदाचं नाव ऐनवेळी बदललं, भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक; नेत्यानं दिला राजीनामा

SCROLL FOR NEXT