महाराष्ट्र बातम्या

MAHA CONCLAVE : ...तर सहकार्याची अपेक्षा ठेवू नका; सहकारातल्या घोटाळेबाजांना अमित शाहांचा इशारा

संतोष कानडे

पुणेः सकाळ माध्यम समूहाच्या वतीने पुण्यामध्ये सहकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या परिषदेला केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांची उपस्थिती होती. या परिषदेमध्ये अमित शाह यांनी सहकारातील अडी-अडचणी आणि त्यासाठी सुरु असलेले प्रयत्न; याविषयी सविस्तर विवेचन केलं.

राज्यातल्या अनेक सहकारी बँका घोटाळ्यांमुळे बुडालेल्या आहेत. त्या मुद्द्यावर बोलतांना शाह म्हणाले की, आपण संस्था टिकवल्या पाहिजेत, चांगल्या चालवल्या पाहिजेत. सोलापूर, नागपूर, कोल्हापूर या जिल्हा सहकारी बँकांमध्ये घोटाळे झाले. राज्यातल्या कित्येक बँकांवर प्रशासक नेमावा लागला, हे दुर्दैवी आहे. आता आपण सुधारलं पाहिजे. आपण चुका करायच्या आणि सहकार्याची अपेक्षा करायची. असं असेल तर तुम्हाला सहकार्य होणार नाही, असं अमित शाह म्हणाले.

अमित शाह यांच्या भाषणातील मुद्दे...

  • सहकार क्षेत्रावरचा विश्वास उठत असेल असं आपण असू तर लोक विश्वास ठेवणार नाही

  • सोलापूर, नागपूर, कोल्हापूर जिल्हा सहकारी बँकांमध्ये घोटाळे झाले आहेत

  • राज्यातल्य अनेक बँकांमध्ये प्रशासक ठेवण्याची वेळ आली आहे

  • ही चांगली गोष्ट नाही. हे सुधारलं पाहिजे. मी तुमच्या सोबत आहे

  • परंतु तुम्हीही संस्था चांगल्या रितीने चालवल्या पाहिजेत

  • आपण स्वतःला सुधारण्याची तयारी ठेवत नाहीत आणि सहकार्याची अपेक्षा करतात

  • असं असेल तर कुणीही सहकार्य करणार नाही

  • रिझर्व्ह बँक सहकारी बँकांना सहकार्य करेलच. या संस्था वाचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे

  • पुण्यातील रुपी सहकारी बँक बुडाली, याची कारणं शोधली पाहिजेत, आत्मचिंतन केलं पाहिजे

सहकार परिषदेत मांडलेल्या मुद्द्यांची सोडवणूक करणार- शाह

  • सहकार परिषदेमध्ये बोलतांना अमित शाह म्हणाले की, या परिषदेत मांडल्या गेलेल्या अनेक मुद्द्यांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.

  • शाहू महाराजांनी कास्तकरांसाठी एक संस्था सुरू केली. सहकार हा महाराष्ट्राचा स्वभाव आहे.

  • विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता आणि अमुलचे संस्थापक यांचा त्यात समावेश आहे.

  • ३० वर्षांपेक्षा जास्त सहकार क्षेत्रात मी काम केलं आहे.

  • अनेक वर्षे कृषी आणि सहकार मंत्रालय वेगळं करण्याची मागणी होती. पण ते झालं नव्हतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

SCROLL FOR NEXT