Nitin-Gadkari 
महाराष्ट्र बातम्या

"एमएसएमई' लवकरच सुरू करणार ही योजना, नितीन गडकरींनी केली घोषणा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : एमएसएमई ही केंद्राची संस्था लवकरच स्टॉक एक्‍सचेंज सुरू करणार असून देशातील आणि परदेशातील गुंतवणूकदारांना यात आपला पैसा गुंतवता येईल. तसेच सर्वसामान्य माणूसही एमएसएमईचे शेअर खरेदी करून गुंतवणूक करू शकेल, अशी माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

"महाबीझ'च्या पदाधिकाऱ्यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. गल्फ महाराष्ट्र बिझिनेस फोरमने हा संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. विमा आणि शेअर्समध्ये गुंतवणुकीची संधी सध्या असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले, उच्च प्रगती करणाऱ्या एमएसएमई उद्योगांना शासनाकडून रेटिंग मिळेल आणि शासनही 15 टक्के भागभांडवल उपलब्ध करून देईल. ऍमेझॉनसारखे "ई मार्केट प्लेस' ही एमएसएमई तयार करीत आहे. कोरोनामुळे त्याला वेळ लागणार आहे. पण, हे संकेतस्थळ सुरू झाल्यानंतर ऑनलाईन व्यवहार लोकांना करता येतील, असेही गडकरी म्हणाले. 
 

आत्मनिर्भर पॅकेजमध्ये 3 लाख कोटी बजेट एमएसएमईला मिळाले. याचा फायदा 45 लाख एमएसएमई उद्योगांना होणार आहे. फंड ऑफ फंडच्या माध्यमातून 50 हजार कोटींचे इक्विटी इनफ्यूजन, जे एमएसएमई उद्योग जलद गतीने प्रगती करीत आहेत. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीसाठी हा योग्य काळ आहे. सध्या या क्षेत्राची स्थिती चांगली असून मागील 5 वर्षात आपण 17 लाख कोटींची कामे या क्षेत्राला दिली आहे. ऍग्रो एमएसएमईच्या संकल्पनेतून ग्रामीण भागात, जंगल क्षेत्रात आणि आदिवासी भागात उद्योग नेऊन या भागाचा विकास करण्याची संकल्पना यावेळी गडकरी यांनी मांडली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT