nitin gadkari
nitin gadkari nitin gadkari
महाराष्ट्र

महाराष्ट्राचा सुपूत्र पंतप्रधान का होऊ शकला नाही? गडकरींनी दिले उत्तर

भाग्यश्री राऊत

नागपूर : देशाचे भावी पंतप्रधान म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (union minister nitin gadkari) नावाची नेहमीच चर्चा रंगत असते. मात्र, पंतप्रधान होण्यासाठी गडकरींना काय समस्या आहे? तसेच आतापर्यंत महाराष्ट्राचा सुपूत्र पंतप्रधान का झाला नाही? असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यावेळी गडकरी म्हणाले, 'महाराष्ट्राचाच पंतप्रधान झाला पाहिजे असं मला एक टक्काही वाटत नाही. महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करणारा योग्य व्यक्ती पंतप्रधान झाला पाहिजे. त्याची जात, पंत, भाषा, प्रांत कुठलाही असो. त्यामुळे मराठी माणूसच झाला पाहिजे किंवा महाराष्ट्राचाच पंतप्रधान (future PM) झाला पाहिजे, हे मला मान्य नाही. उद्या कुठलाही मराठी माणूस त्या पात्रतेचा असेल तर पंतप्रधान होईल. त्याला ती संधी मिळेल.'

नितीन गडकरी 'एबीपी माझा'च्या विशेष कार्यक्रमात बोलत होते. त्यांनी यावेळी विकास कसा करायचा यावरही भाष्य केले. महाराष्ट्रात सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे. पाण्याच्या प्रश्नाकडे प्राथमिकतेने लक्ष दिलं पाहिजे. पुणे, मुंबई याठिकाणी मोठ्या प्रमाणात शहरीकरण झाले आहे. त्याला कुठेतरी विकेंद्रीकरण करता येईल का? याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच देशात आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध करायला पाहिजे. त्यामुळे समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचा लाभ घेता येईल, असेही गडकरी म्हणाले.

सत्ता गेली की लोक अस्वस्थ होतात -

राजकारणात मतभिन्नता असली पाहिजे. मतभेद असता कामा नये, असे अटलबिहारी वाजपेयी म्हणायचे. त्यांचे विचार आमचे आदर्श आहेत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या विचारांनुसार चालण्याचा अधिकार आहे. जनतेच्या न्यायालयात कुठला पक्ष विकासाभिमुख आहे, कोणतं नेतृत्व योग्य आहे हे ठरविण्याचा अधिकार त्यांचा आहे. शेवटी जयपराजय होतच असतात. कधी कधी अच्छे दिन कधी बुरे दिन येतात. मात्र, आजकाल विरोधी पक्षात जातात तेव्हा लोक अस्वस्थ होतात. आपण सत्तेत असू तेव्हा जबाबदारीने काम करू आणि विरोधात असू तर त्यापेक्षा चांगले काम करू, असे विचार ठेवले तर लोकशाहीत गुणात्मक बदल होतील, असेही गडकरी म्हणाले.

विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा -

काँग्रेस आणि आम्ही एकमेकांचे विरोधक आहोत. पण, सर्वांनी सोबत येऊन काम करायला पाहिजे. आपल्या महाराष्ट्रात विरोधक आणि सत्ताधारी सोबत काम करण्याची मोठी परंपरा आहे. यशवंत राव चव्हाण, शरद पवार, वसंतराव नाईक या सर्वांनी नेहमी विरोधी पक्षाला बरोबर घेऊन राजकारण केलं. कधी कधी त्यांना अमर्याद बहुमत मिळालं तरी देखील चार पाच आमदार असलेल्या पक्षाचा सन्मान केला. पक्षाचे अभिनिवेश असतात. जातीचे अभिनिवेश असतात. मात्र, त्यावरून उठून आपल्याला लोकशाहीचे मूल्य जपून विकास करायचा आहे. राजकारणाच्या मर्यादाही सांभाळणे गरजेचे आहे. मतभिन्नता ठेवायची. मात्र, मतभेद ठेवू नये, असेही गडकरी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्क की फ्लोरिडा... भारताच्या सराव सामन्याबाबत गोंधळ

Latest Marathi News Live Update : पिंपरीत होर्डिंग कोसळलं, चार दुचाकींचं नुकसान

SCROLL FOR NEXT