महाराष्ट्र बातम्या

रंग-रेषांची उलगडली अनोखी दुनिया

चित्रकारांचे सादरीकरण : साहित्य संमेलनात प्रथमच ‘कलाकट्टा’

सकाळ वृत्तसेवा

कुसुमाग्रजनगरी : कॅनव्‍हासवर रंगांची केलेली उधळण. निसर्गाचे टिपलेले सौंदर्य. चित्रकलेच्‍या विविध प्रकारांचा वापर करताना साकारलेल्‍या भन्नाट चित्राकृती... असे काहीसे उत्‍साही वातावरण शनिवारी (ता. ४) ‘कलाकट्टा’ उपक्रमावेळी अनुभवायला मिळाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रथमच भरविण्यात आलेल्या चित्र व शिल्‍पप्रदर्शनाच्या निमित्ताने चित्रकार, शिल्‍पकारांनी सादर केलेल्या कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांना नवोदितांसह उपस्‍थितांनी उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद दिला. संजय दुर्गावाड, संतोष मासाळ यांनी रेखाटलेल्‍या चित्राकृतींनी दिवसाची सुरवात झाली. श्री. मासाळ यांनी रचनाचित्र रेखाटले, तर दुर्गावाड यांनी जलरंगातील लँडस्‍केप चित्राकृतीचे प्रात्यक्षिक दाखविले. यानंतर अनिकेतन महाले यांनी जलरंगात लँडस्‍केपचे प्रात्‍यक्षिक दाखविले. तर राजेश सावंत यांनी रचनाचित्र रेखाटताना उपस्‍थितांचे लक्ष वेधले. यानंतर दुपारच्‍या सत्रात यतीन पंडित यांचे शिल्‍पाकृती साकारण्याचे प्रात्‍यक्षिक, राहुल पगार यांचे जलरंगातील व किरण जगताप यांचे कॅलिग्राफीचे सादरीकरण रसिकांना भावले. दिवसभरात या ठिकाणी भेट देताना सारस्‍वतांनी अनोख्या चित्रकृतींची अनुभूती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Drug Injections: हडपसरमध्ये नशेच्या इंजेक्शनची बेकायदा विक्री उघड; सराईत गुन्हेगार अभिषेक भडंगे अटक, ८२ बाटल्या जप्त

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Latest Marathi News Live Update : पुण्यात जावयाकडून सासूवर काळी जादू, स्मशानात केलं अघोरी कृत्य

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT