sakal breaking Esakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापुरात संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ विनापरवाना बाईक रॅली! भिडे समर्थकांची पोलिसांकडून धरपकड; गर्दी पांगविण्यासाठी लाठीचार्ज

संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. कोणतीही परवानगी न घेता रॅली काढल्याने पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी तेथे गर्दी जमत होती. ते पोलिसांचेही ऐकत नव्हते.

तात्या लांडगे

सोलापूर : संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बाईक रॅली काढली. कोणतीही परवानगी न घेता रॅली काढल्याने पोलिसांनी काहींना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांच्या सुटकेसाठी समर्थकांनी फौजदार चावडी पोलिस ठाणे गाठले. त्यावेळी तेथे गर्दी जमत होती. ते पोलिसांचेही ऐकत नव्हते.

पोलिस ठाण्याबाहेर तणाव वाढत असताना सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांनी तेथे भेट दिली. तरीसुद्धा भिडे समर्थक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी पोलिसांसह राखीव पोलिस अंमलदारांनी लाठीचार्ज केला. तसेच पोलिसांविरूद्ध घोषणाबाजी करणाऱ्यांची पोलिसांनी धरपकड सुरु केली. आता पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे पोलिसांनी गस्त देखील वाढविली आहे. सध्या वातावरण शांत आहे.

ठळक बाबी...

  • - संभाजी भिडे यांच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी संघटनांकडून विनापरवाना बाईक रॅली

  • - छत्रपती संभाजी महाराज चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत बाईक रॅली

  • - काहींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते, त्यांच्या सुटकेसाठी काही कार्यकर्ते फौजदार चावडी पोलिसांत दाखल झाले होते

  • - त्यावेळी भिडे समर्थकांची गर्दी जमली होती; त्यावेळी राखीव पोलिस बलाचे अंमलदार त्याठिकाणी बोलावले होते

  • - सहायक पोलिस आयुक्त डॉ. संतोष गायकवाड यांनी त्याठिकाणी भेट दिली होती

  • - त्यानंतर काही क्षणातच लाठीचार्ज सुरु झाला; कार्यकर्त्यांची धरपकड

  • - महापालिकेचे माजी नगरसेवक राजकुमार पाटील यांचीही बाचाबाची

  • - पोलिसांच्या लाठीचार्जनंतर पोलिसांच्या निषेधार्थ संभाजी भिडे समर्थकांची घोषणाबाजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT