solapur city

 

sakal

महाराष्ट्र बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आज निघणार विनापरवाना दुचाकी रॅली! सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनीच नाकारला पोलिसांचा नियम; शांतता कमिटीचे सदस्यच आयोजक

सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढणार असल्याचे सतीश तमशेट्टी यांच्या सोशल मिडियावरील पोस्टवर म्हटले आहे. पोलिसांनी मात्र रॅलीला परवानगी नाकारल्याचे सांगितले.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूर-मुंबई विमानसेवेच्या शुभारंभासाठी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी रॅली काढणार असल्याचे सतीश तमशेट्टी यांच्या सोशल मिडियावरील पोस्टवर म्हटले आहे. पोलिसांनी मात्र रॅलीला परवानगी नाकारल्याचे सांगितले.

अशोक चौकातून निघणारी ही रॅली कुमठा नाका-गुरूनानक चौक-होटगी रोड-आसरा चौकामार्गे विमानतळ, अशी काढली जाणार आहे. बुधवारी (ता. १५) सकाळी ११ वाजता सोलापूर शहरातील प्रभाग क्र. १३ मधील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते ही रॅली काढणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विमानसेवा शुभारंभाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदार कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे आयोजक पोलिस आयुक्तालयाच्या शांतता कमिटीचे सदस्य आहेत. पोलिसांकडे आयोजकांनी परवानगी मागितली होती, पण मागील वर्षभरात आपण कोणालाही दुचाकी रॅली काढू दिलेली नाही. वाहतूक कोंडी, अपघात व त्यातून वाद होऊ नयेत म्हणून सोलापूर शहर पोलिसांनी दुचाकी रॅलीची परवानगी बंद केल्याचे सांगून पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली. तरीदेखील भाजपचेच पदाधिकारी, कार्यकर्ते रॅली काढणार आहेत हे विशेष.

पोलिस अधिकाऱ्यांचाही नाईलाज...

शांतता व सुव्यवस्थेसाठी आम्ही सोलापूर शहरात मोटारसायकल रॅलीसाठी परवानगी देणे बंद केले आहे. वर्षभर सर्वांनी त्याचे पालनही केले, पण आता मुख्यमंत्री सोलापूर येणार असल्याने सत्ताधारी भाजपचेच काही पदाधिकारी, कार्यकर्ते दुचाकी रॅली काढणार आहेत. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी रॅलीसाठी परवानगी मागितली, पण परवानगी दिलेली नसतानाही ते रॅली काढण्यावर ठाम आहेत. सत्ताधारीच आता नियम पाळणार नसतील तर यापुढे सर्वांनाच (जे परवानगी मागतील त्यांना) रॅलीसाठी परवानगी द्यावी लागेल, असे एका पोलिस अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

परवानगीसाठी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिला पोलिसांना अर्ज

राज्याचे मुख्यमंत्री बुधवारी दुपारी एकच्या सुमारास सोलापूर-मुंबईच्या विमानसेवेच्या शुभारंभासाठी सोलापूरच्या विमानतळावर येतील. तत्पूर्वी, अशोक चौकातून निघणारी दुचाकी रॅली विमानतळावर पोचेल. रॅलीच्या परवानगीसाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे.

- सतीश तमशेट्टी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT