Unseasonal Rain Esakal
महाराष्ट्र बातम्या

Unseasonal Rain: पुणे, कोल्हापूर, सांगली, अहमदनगर इथं जोरदार पावसाला सुरुवात; 'या' जिल्ह्यात लवकरच कोसळणार

Wether Updates: विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. त्यानुसार, सध्या कोल्हापूर, सांगली आणि अहमदनगर जिल्ह्यांतील काही भागात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्याचबरोबर येत्या तीन तासांत इतरही काही जिल्ह्यांमध्ये पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. (unseasonal heavy rains started in kolhapur sangli ahmednagar will rain soon in other districts also)

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग) पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सतर्क या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खासगी संस्थेनं विजा, वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

दरम्यान, पुणे शहरातही ढग दाटून आले असून जिल्ह्यातही पावसाचं वातावरण तयार झालं आहे, काही ठिकाणी पावसाला सुरुवातही झाली आहे. खडकवासला परिसरात वादळी वारा, वीजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. तापलेल्या भुईवर पावसाचे थेंब पडू लागल्यानं मातीचा सुंगध सर्वत्र पसरला आहे. तसेच सिंहगड रस्ता परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे.

याठिकाणी पावसापूर्वी सोसाट्याचा वारा वाहू लागल्यानं तसेच झाडांच्या पानांवर आणि परिसरात असलेली धूळ उडून समोरचे दृश्य दिसेनासं झालं होतं. मात्र, त्यानंतर सुरू झालेल्या मुसळधार पावसानं हवेत गारवा निर्माण झाला आहे.

Unseasonal Rain in Nashik

दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरासह तालुक्यात पावसानं जोरदार हजेरी लावली. सुमारे तीन वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली आहे. आकाशात विजेचा कडकडाट सुरु असून शेतकरी वर्गाची पिकं झाकण्यासाठी धावपळ सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे-अहिल्यानगर महामार्गावर वाहतूककोंडीचा कहर! सलग तिसऱ्या दिवशी १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

Ladki Bahin Yojana October Installment : लाडक्या बहिणींचा ऑक्टोबरचा 1500 रुपयांचा हप्ता 'या' तारखेला होणार जमा? समोर आली महत्त्वाची अपडेट, सरकारकडून अधिकृत घोषणा कधी?

अवघ्या २ कोटींचं बजेट, जगभरात ४५० कोटींची कमाई; 'हनुमान अंश' आता ओटीटीवर होणार रिलीज, कुठे पाहता येणार?

Latest Marathi News Live Update: अभिनेते सयाजी शिंदे कर्जतमध्ये दाखल

Mumbai Local: दिवाळीत मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकचा अडथळा! लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशीलाच ब्लॉक; पश्चिम रेल्वेचा प्रवाशांना दिलासा

SCROLL FOR NEXT