1help_20farmer solapur
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर जिल्ह्याला अवकाळी पावसाचा झटका! 2 व्यक्तींसह 72 जनावरांचा मृत्यू; जिल्ह्यात 2552 हेक्टरवरील पिकांचेही नुकसान, पण पंचनामे...

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींसह ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला प्रत्येकी चार लाखांची मदत दिली जाणार असून त्यासाठी शवविच्छेदन अहवाल यायचा बाकी आहे. तर मृत जनावरांसाठीही नियमानुसार भरपाई दिली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींसह ७२ जनावरांचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्तीला प्रत्येकी चार लाखांची मदत दिली जाणार असून त्यासाठी शवविच्छेदन अहवाल यायचा बाकी आहे. तर मृत जनावरांसाठीही नियमानुसार भरपाई दिली जाणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी दिली.

चालू महिन्यात (एप्रिल) जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. शासनाने नैसर्गिक आपत्तीच्या काळात निगेटिव्ह ग्रॅण्डमधून निधी वितरित करण्यासंदर्भातील आदेश दिले आहेत. त्यामुळे अवकाळी पावसात मृत व्यक्ती व जनावरांसाठी नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे अजून पूर्ण झालेले नाहीत. कृषी विभागाकडील प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील अडीच हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात केळी, आंबे, द्राक्ष अशा पिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. दरम्यान, पंचनामे वेळेत पूर्ण करून तातडीने अहवाल देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधितांना दिले आहेत.

पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमके किती नुकसान झाले आहे, त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून संबंधितांना भरपाई मिळणार आहे. शासनाकडून कधीपर्यंत भरपाई मिळेल हे स्पष्टपणे आता कोणीही सांगू शकत नाही, दुसरीकडे सोलापूरसह राज्यातील २१ जिल्ह्यांमधील एक लाख हेक्टरला अवकाळीचा फटका बसला असून त्याचे पंचनामेही पूर्ण झालेले नाहीत. तोपर्यंत मृत जनावरांसाठी व्यक्तींच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई तातडीने वितरीत केली जात आहे.

अवकाळी पावसामुळे नुकसान

  • व्यक्ती मृत्यू

  • जनावरांचा मृत्यू

  • ७२

  • शेतीचे नुकसान

  • २५५२ हेक्टर

पंचनामे काही दिवसांत पूर्ण होईल

अवकाळी पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील दोन हजार ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तर दोन व्यक्तींचा आणि ७२ लहान-मोठ्या जनावरांचाही मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती व जनावरांसाठी लवकरच मदत वितरित केली जाईल. शेती नुकसानीचे पंचनामे काही दिवसांत पूर्ण होऊन त्याचा अहवाल शासनाला सादर होईल.

- मनीषा कुंभार, निवासी उपजिल्हाधिकारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : एरंडोलमध्ये ८२ सार्वजनिक गणेश मंडळांकडून उत्साहात गणरायाची स्थापना

पतीचा मंगळदोष दूर करण्यासाठी पत्नीच्या प्रायव्हेट पार्टला हळदी कुंकू लावून...; भोंदूबाबाकडून अघोरी कृत्य, हुंड्यासाठी छळ

Ganesh Chaturthi 2026: क्रिकेटपटूंचा ‘सुपर सिलेक्टर’ म्हणून प्रसिद्ध खजराना गणपती; दरवर्षी १ इंचाने वाढतो स्वयंभू मूर्तीचा आकार?

Ganesh Chaturthi 2026 : गणपतीचे जन्मस्थान कोणते माहितीय? इथे कधीच होत नाही गणेश विसर्जन! जाणून घ्या डोडीतालचे रहस्य

Asia Cup 2026 : 'त्यांच्याकडून आणखी काही मागू शकत नाही...', कर्णधार हरमनप्रीत कौरने चॅम्पियन झाल्यानंतर काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT