Unseasonal Rain Esakal
महाराष्ट्र बातम्या

Unseasonal Rain: राज्यात अवकाळी-गारपिटीचा तडाखा, वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू, तर शेतीचं मोठं नुकसान

वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे शेतात होत्याचं नव्हतं झालं

अंकिता खाणे (Ankita Khane)

बीड जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा मोठा फटका बसला आहे. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, गारपीट आणि विजेचा कडकडाट यामुळे शेतात मोठं नुकसान झालं आहे. नद्या देखील दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. जिल्ह्यात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. तर अन्य 2 शेतकरी जखमी झाले आहेत.

त्याचबरोबर जिल्ह्यातील विविध भागात 12 ते 15 जनावरे दगावली आहेत. मोठमोठ्या गारांनी कांदा चाळीवर असलेल्या पत्र्याची चाळण झाली. बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी गारपीटीमुळे बर्फाची चादर पसरल्याचे दिसून येत आहे. शेतातील गहू, ज्वारी, आंबा, मोसंबी, पपई, टरबूज, भाजीपाला यासह विविध पिकं भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

महादेव किसन गर्जे वय 60 राहणार सुर्डी असं वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते शेळ्या चारण्यासाठी गेले असता अचानक वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊस वाढल्याने ते एका झाडाखाली थांबले. मात्र याचवेळी झाडावर वीज कोसळून त्यांचा जागीच दुर्दैवी मुत्यू झाला. तर यावेळी त्यांच्या दोन शेळ्या देखील दगावल्या आहेत.

दुसरी घटना बीड तालुक्यातील तिप्पटवाडी येथे घडली असून वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज पडून दोन बैल दगावले आहेत. यामुळे शेतकरी आनंता नामदेव शेडगे यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. तिसरी घटना केज तालुक्यातील देवगाव व मांगवडगाव येथे घडली. देवगाव येथे वीज पडून नारायण मुंडे यांचा बैल तर मांगवडगाव येथे वीज पडून दत्तू मुळूक यांची गाय दगावली आहे. (Latest Marathi News)

चौथी घटना केज तालुक्यातील रामेश्वरवाडी शिवारात घडली. शेतामध्ये असलेले जयराम तुकाराम हंगे यांचा 1 बैल व 1 गाय तसेच शशिकांत संपतराव हंगे यांचा 1 बैल वीज पडून दगावले आहेत. यासह जिल्ह्यातील अनेक भागात अशा घटना घडल्या आहेत. (Beed News)

केज तालुक्यातील मांगवडगाव येथील सरु बाई गुणवंत गायकवाड आणि सुकुमार रामधन गायकवाड या एकाच घरातील शेतकऱ्यांचे, सोलारचे दोन सेट वादळी वाऱ्याने पूर्णपणे उखडून गेले आहेत. काही सोलार प्लेट्स या विहिरीमध्ये जाऊन पडल्या. शेतकरी गायकवाड कुटुंब त्या सोलारवर दहा एकर जमीन भिजवत होते. 2019 ला हे सोलार बसवलेले होते आणि तेव्हापासून त्यांचं शेतीचे उत्पन्न वाढलं होतं. मात्र एका दिवसामध्ये होत्याचं नव्हतं झालं आणि या शेतकरी कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT