Maharashtra Weather Update Esakal
महाराष्ट्र बातम्या

Maharashtra Weather Update: अवकाळीमुळे बळीराजा पुन्हा संकटात; विदर्भात गारपिटीने पिके आडवी, आज 'येलो अलर्ट'

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. तर आज देखील विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बंगालच्या उपसागरावरून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाच्या सरी कोसळल्या. काही तुरळक ठिकाणी गारपीटही झाली. त्यामुळे गेल्या आठवड्यात वाढलेला किमान तापमानाचा पारा पुन्हा घसरला. विदर्भातील अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये शनिवारी (ता. १०) वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीने तडाखा दिला आहे.(Maharashtra Weather Update)

तर उर्वरित राज्यात उन्हाचा चटका वाढल्याने घामाच्या धारा वाहत आहेत. उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. आज (ता. १२) विदर्भात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे

विदर्भातील वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये शनिवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि वादळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आजही विदर्भामध्ये अवकाळी पावसाची शक्यता (Rain In Vidarbha) वर्वण्यात आली आहे.

शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज खरा ठरवत वरुणराजाने रविवारी उपराजधानीसह ग्रामीण भागांतही जोरदार हजेरी लावली. भंडारा, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यांसह नागपूर जिल्ह्यातील मौदा, कुही व कामठी तालुक्यांना गारपिटीने जोरदार तडाखा दिला, तर शहरातही विजांसह वादळी पावसाने हजेरी लावली. विदर्भात आज (सोमवारी)ही पावसाचा इशारा असल्याने बळीराजाची चिंता व धाकधूक कायम आहे.

यक्लोनिक सर्क्युलेशन’मुळे सध्या विदर्भात पावसाळी वातावरण आहे. रविवारी (ता.११) नागपूर, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये पाऊस व गारपिटीने धुमाकूळ घातला. यात रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागा व उन्हाळी धानाचे नुकसान झाले आहे. या अवकाळीमुळे आंब्याचा मोहोर झडला असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

नागपूरलाही मध्यरात्रीच्या सुमारास वादळी पावसाने झोडपले. रात्री बारानंतर उत्तर नागपुरातील गोधनी, मानकापूरसह अनेक भागांमध्ये ताशी ३० ते ४० किमी वेगाने आलेल्या सोसाट्याचा वाऱ्यासह जवळपास अर्धा तास टपोऱ्या थेंबांचा पाऊस पडला.

सूर्यदर्शन नाही

ढगाळ वातावरणामुळे रविवारी दिवसभर सूर्यनारायणाचे दर्शन झाले नाही. सायंकाळी पुन्हा आभाळ भरून आले, वादळ सुटले होते, मेघगर्जनाही झाल्या. हवामान विभागाने सोमवारीसुद्धा नागपूरसह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. सोमवारनंतर मात्र हळूहळू आकाश निरभ्र होऊन तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT