unsung Hausatai Bhagwanrao Patil sakal
महाराष्ट्र बातम्या

क्रांतिकन्या

इंग्रजांच्या दडपशाही विरोधात मोठे बंड उभारणाऱ्या आणि इंग्रज व पोर्तुगीजांच्या बंदुकींच्या गोळ्यांना न जुमानणाऱ्या क्रांतिकन्येचे नाव आहे ‘हौसाताई भगवानराव पाटील’.

प्रशांत सरुडकर guruprasad309@gmail.com

इंग्रजांच्या दडपशाही विरोधात मोठे बंड उभारणाऱ्या आणि इंग्रज व पोर्तुगीजांच्या बंदुकींच्या गोळ्यांना न जुमानणाऱ्या क्रांतिकन्येचे नाव आहे ‘हौसाताई भगवानराव पाटील’.

इंग्रजांच्या दडपशाही विरोधात मोठे बंड उभारणाऱ्या आणि इंग्रज व पोर्तुगीजांच्या बंदुकींच्या गोळ्यांना न जुमानणाऱ्या क्रांतिकन्येचे नाव आहे ‘हौसाताई भगवानराव पाटील’. त्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या एकुलत्या एक कन्या आणि क्रांतिवीर भगवानराव पाटील यांच्या पत्नी. हौसाताई केवळ तीन वर्षांच्या असताना त्यांचे मातृछत्र हरपले.

क्रांतिसिंह भूमिगत होते, एवढे कमी म्हणून की काय त्यांची शेतजमीन, घरदार इंग्रजांनी जप्त केले. हौसाताईंचे अवघे बालपण असे गेले. पुढे भवानीनगर पोलिस स्टेशनमधील बंदुका पळविण्याचे कार्य असो, अगर वांगीचा डाकबंगला जाळण्याचे कार्य असो, त्यात त्या यशस्वी झाल्या.

तुफान सेनेचे सैनिक बाळ जोशी हे गोव्यातून शस्त्र आणताना सापडले. पोर्तुगिजांनी त्यांना पणजीच्या तुरूंगात ठेवले. हा गुन्हा मोठा होता. त्यांना फाशीची शिक्षा होईल, अशी स्थिती निर्माण झाली. काहीही करून बाळ जोशी यांना सोडविले पाहिजे, असे सर्वांना वाटू लागले. मात्र, सुटकेचे नियोजन त्यांना तुरूंगात समजणार कसे?

ही जबाबदारी हौसाताईंनी पार पाडावी, असे सर्वांना वाटले. त्या पणजीला गेल्या. केसाच्या अंबाड्यात चिट्ठी बांधली होती. बाळ जोशींची बहीण असल्याचे तिथे सांगितले. चिठ्ठी पोहोच झाली व पुढे दोन दिवसातच बाळ जोशी नियोजनाप्रमाणे बाहेर निसटले. पोर्तुगीजांना संशय आला. पोर्तुगीज मागावर आहेत, हे समजताच त्यांनी मांडवी नदीत उडी घेतली आणि पलीकडील जंगलातून अनवाणी वाट काढत, रात्रंदिवस प्रवास करून त्या गावी पोहोचल्या.

ही जबाबदारी हौसाताईंवर सोपविण्यात आली, तेव्हा त्यांचे चार महिन्याचे बाळ आजारी होते. त्यांनी बाळाची अडचण सांगितली. ही गोष्ट क्रांतिसिंह नाना पाटलांना समजली. ते म्हणाले, ‘‘मी तिला जा ही म्हणणार नाही आणि नकोही म्हणणार नाही.

परंतु, माझी मुलगी म्हणून, बाप करत असणाऱ्या कार्याला शोभेल असे तिने वागावे.’’ म्हणजेच, हौसाताईंनी अडचणी न सांगता या क्रांतिकार्यासाठी जावे असे क्रांतिसिंहांनी अप्रत्यक्षरीत्या सांगितले. हौसाताईंनी हे ऐकताच बाळाला शेजारील कुटुंबाकडे ठेवले आणि या कार्यासाठी त्या घराबाहेर पडल्या आणि यशस्वीही झाल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Railway Station: "थोरले बाजीराव पेशवे पुणे स्टेशन… "; रेल्वे स्थानकावर झळकले बॅनर, राज्यात नवा वाद पेटला!

Latest Maharashtra News Updates : शिवरायांनी महाराष्ट्रात स्वराज्याचे संस्कार रुजवले- शाह

Ind Vs Eng: हेझलवूडचा सल्ला मानला अन् आकाश दीपनं उडवली इंग्लंडची भंबेरी, काय होतं सिक्रेट?

Kolhapur : भूत काढण्याच्या बहाण्याने बेदम चोप, भोंदूबाबाकडून प्रसादाच्या नावाने लूट; कोल्हापूर अंधश्रद्धेच्या अडकत आहे का?

Ahilyanagar Accident:'टाकळीमियाच्या दिंडीला भीषण अपघात'; पिकअपच्या धडकेत ट्रॅक्टर-ट्रॉली उलटली; नऊ वारकरी जखमी

SCROLL FOR NEXT