konkan rain update
konkan rain update 
महाराष्ट्र

मुंबई, पनवेलसह कोकणात पुढील 3 ते 4 तास पावसाचा इशारा - IMD

सकाळ डिजिटल टीम

मुंबईसह काही ठिकाणी पाऊस सुरू झाला असून सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची रिपरिप सुरु आहे. काल हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्याप्रमाणे काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, आता हवामान खात्यानं आज मुंबई, पनवले आणि कोकणातील काही जिल्ह्यांना पुढील 3 ते 4 तासांत पावसाच्या हलक्या पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने या संदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. आज मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, रायगड, पालघरच्या काही भागात येत्या ३ ते ४ तासांत पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. मुंबई आणि आजूबाजूच्या काही ठिकाणी पाऊस आधीच सुरू झाला आहे. तसेच संपूर्ण कोकणात पुढील ४ ते ५ दिवस मान्सुन सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महत्वाच्या कामाव्यतरिक्त घरातून बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात वेगाने बदल होत आहेत. कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग व मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागातील सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यताही आहे. दरम्यान, जून महिना पूर्णत: कोरडा गेला आहे. मात्र जुलै महिन्यात पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे कोकणासह काही भागांत शेती कामांना वेग आला आहे. पावसाच्या आगमनाने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

SCROLL FOR NEXT