Urfi Javed On Chitra Wagh  esakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Chitra Wagh : उर्फीच्या अडचणीत वाढ; वाघांच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई

उर्फीच्या कपड्यांमुळे तिच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद गेल्या काही दिवसांपासून विकोपाला गेला होता. आता या वादाचा नवा अंक पाहायला मिळत आहे. मुंबई पोलिसांनी आता उर्फी जावेदला समन्स बजावलं आहे. त्यामुळे उर्फीच्या अडचणीत वाढ झाली आहे.

अंबोली पोलीस ठाण्यात उर्फी जावेदची चौकशी होणार आहे. उर्फीला आज हजर होण्याची नोटीसही जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्या तक्रारीची दखल घेत ही कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी अंगप्रदर्शन केल्याप्रकरणी ही कारवाई होत आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक शैला कोराडे यांची या प्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा - सूर्यकुमार...भारतीय क्रिकेट मधला 'लंबी रेस का...'

कालच अभिनेत्री उर्फी जावेदने महिला आयोगाकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे. तिने काल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेटही घेतली. आपण विशिष्ट समाजाचे असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ आपल्याला टार्गेट करत आहेत, तसंच जीवे मारण्याची धमकी देत आहेत, असं उर्फीच्या वकिलांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kapil Sibal on Supreme Court: सर्वोच्च न्यायालयावरच प्रश्नचिन्ह! कपिल सिब्बल स्पष्टच बोलले; "आता कोर्टात जाण्यात अर्थ नाही, विश्वास उडाला!"

Maharashtra Live News : युट्युबर ध्रुव राठी यांची सुटका

IND A vs AUS A: पहिल्या दोन्ही सामन्यांत पराभव, आता व्हाईटवॉश टाळण्याचं आव्हान! ऑस्ट्रेलिया अने जिंकली नाणेफेक; भारत अ प्रथम फलंदाजीला

Ratnagiri ST Bank: चार्जिंग स्टेशनचा महागडा निर्णय ?;नफ्यातील बँक पाडून एसटीवर भाड्याचा बोजा

YCM Hospital Incident : धक्कादायक ! पिंपरी-चिंचवडमध्ये धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण रस्त्यावर पडला; वायसीएम रुग्णालयातील प्रकार, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT