Urfi Javed tweet on chitra wagh said chitra tai meri khaas hai  sakal
महाराष्ट्र बातम्या

Urfi Javed Chitra Wagh : उर्फीने पूर्ण कपडे घातले तरच प्रकरण मिटेल - चित्रा वाघ

उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने तिला टार्गेट केलं जात असल्याची टीका उर्फीच्या वकिलांनी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातला वाद आता शिगेला पोहोचला आहे. चित्रा वाघ यांनी उर्फीवर गुन्हा दाखल कऱण्याची मागणी केली, त्यानंतर आता उर्फीने महिला आयोगाकडे तक्रार केली असून आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलं आहे. आता यावरुन चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उर्फी जावेदने आज चित्रा वाघ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. तसंच आज तिने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भेटही घेतली आहे. यावरुनच चित्रा वाघ यांनी हे प्रकरण आता उर्फी नीट कपडे घालेल तेव्हाच मिटेल, असं उत्तर दिलं आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या, "तिला कुठे जायचं तिथे जाऊदे. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. पण विषय समाजस्वास्थ्याचा आहे. माझी भूमिका मी मांडलेली आहे. माझी लढाई सुरुच राहणार आहे. आम्हाला जे करता येईल ते आम्ही करूच. हे प्रकरण आता तेव्हाच संपेल जेव्हा ती कपडे घालेल. तिने व्यवस्थित कपडे घालावेत. ती अशी फिरेल तर हे प्रकरण चालूच राहील."

उर्फी जावेदच्या वतीने तक्रार दाखल केलेले वकील नितीन सातपुते यांनीही आपली भूमिका मांडली आहे. सातपुते म्हणाले, "मॉडेल उर्फी जावेदला चित्रा वाघ धमकी देत आहेत. उर्फीच्या जीवाला धोका आहे. सार्वजनिक ठिकाणी चित्रा वाघ धमकी देत आहेत. हा गुन्हा आहे. आम्ही महिला आयोगाला तक्रार केली आहे. उर्फी विशिष्ट समाजाची असल्याने वाघ तिला टार्गेट करत आहेत. आम्ही आमच्या परिने तक्रार केली आहे. उर्फी स्वतः येऊन तिची भूमिका मांडेल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT