Ujani Dam Water Sakal
महाराष्ट्र बातम्या

पाणी जपून वापरा! दररोज कमी होतंय उजनीतील एक टीएमसी पाणी; धरण उणे पातळीच्या उंबरठ्यावर; २५ मेनंतर धरणातील पाणी पिण्यासाठीच राखीव

सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातून यंदा शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडल्याने तीव्र उन्हाळा असताना देखील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. सध्या कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना व भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्याने दररोज धरणातून एक टीएमसी पाणी कमी होत आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणातून यंदा शेतीसाठी सलग दोन आवर्तने सोडल्याने तीव्र उन्हाळा असताना देखील शेतकऱ्यांना पाण्याची टंचाई जाणवली नाही. सध्या कालवा, बोगदा, उपसा सिंचन योजना व भीमा नदीतूनही पाणी सोडण्यात आल्याने दररोज धरणातून एक टीएमसी पाणी कमी होत आहे.

सध्या उजनी धरणात एकूण ६८ टीएमसी पाणीसाठा असून त्यात साडेचार टीएमसी (९ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. धरणातून सध्या कालव्यातून २९५० क्युसेक, नदीतून सहा हजार क्युसेक, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनांमधून ४१३ क्युसेक आणि बोगद्यातून ७२० क्युसेकचा विसर्ग सोडण्यात आला आहे. शेतीसाठी सध्या दुसरे आवर्तन सोडण्यात आले असून ते २५ मेपर्यंत सुरू राहणार आहे.

सध्या जिल्ह्यातील पावणेदोन लाख हेक्टर जमिनीला उजनीचे थेट पाणी पोचते. दुसरीकडे बाष्पीभवन आणि बॅक वॉटरवरील कृषीपंप आणि धरणावरील ४२ पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी पाणी उपसा सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीपातळी दररोज एक टीएमसीने खालावत आहे. गतवर्षीपेक्षा यंदा धरणातील पाण्याची स्थिती चांगली असून पावसाळा सुरू होईपर्यंत (जुलै-ऑगस्टपर्यंत) पुरेल इतका पाणीसाठा धरणात आहे. तरीदेखील, २५ मेपासून धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे.

जूनमध्ये सोलापूर शहरासाठी एक आवर्तन

सोलापूर शहरासाठी उजनी ते सोलापूर अशी समांतर जलवाहिनी टाकली आहे. पण काम अजूनही १०० टक्के पूर्ण झालेले नाही. त्यामुळे चालू वर्षात सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून दोनदा धरणातील पाणी सोडण्यात आले आहे. अजूनही जूनच्या पहिल्या आठवड्यात सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागणार आहे. मेअखेर धरणातील पाणी उणे २५ टक्क्यांपर्यंत पोचेल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. उणे २० टक्क्यानंतर कॅनॉलमधून शेतीसाठी पाणी सोडता येत नसल्याने २५ मेनंतर धरणातील पाणी फक्त पिण्यासाठीच असणार आहे.

धरणातील पाण्याची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ६८ टीएमसी

  • उपयुक्त पाणीसाठा

  • ४.६३ टीएमसी

  • सध्या सोडलेले पाणी

  • १०,००० क्युसेक

  • दररोज कमी होणारे पाणी

  • १ टीएमसी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : माढा तालुका पंचायत समितीवर भाजप आणि अजित पवार गटाची सत्ता

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT