Utkarsha Will, You Marry Me Kolhapur  esakal
महाराष्ट्र बातम्या

'उत्कर्षा माझ्याशी लग्न कर!', फ्लेक्स लावून गड्यानं घातली लग्नाची मागणी

तो फोटो सोशल मीडियावर त्या पोस्टनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

संभाजी थोरात

Viral News: प्रेम करुया खुल्लम खुल्ला असं जरी गाण्यातून ऐकलं असलं, प्यार किया तो डरना क्या असं मुघले आझममध्ये पाहिलं असलं तरी काहीजण असे (Love Story) असतात की, त्या गोष्टी प्रत्यक्षात आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. ज्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही वेगळं करण्याची इच्छा आहे ते तर आपल्या प्रेमाची जाहिर साक्ष पटवून देण्यासाठी अनेक क्रिएटिव्ह पद्धतीनं (Maharashtra News) नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतात. सोशल मीडियावर दररोज अशा प्रकारची क्रिएटिव्हीटी नेटकऱ्यांना प्रभावित करत असते. जगात भारी कोल्हापुरी असं म्हटलं जातं.....त्याचा प्रत्यय हा एका पोस्टवरुन दिसून आला आहे. तो फोटो कोल्हापुरमधील आहे. त्यात एकानं आपल्या प्रियसीला लग्नाची मागणी ही थेट फ्लेक्स लावून केली आहे. त्याची सध्या सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात चर्चा आहे.

तो फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. नेटकऱ्यांनी त्या पोस्टवर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कोल्हापूरातल्या एका तरुणानं मोठ्या फ्लेक्सद्वारे एका मुलीला लग्नासाठी प्रपोज केले आणि त्या मुलीने सुद्धा त्याला होकार दिल्याची घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर मुलीच्या आणि मुलाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला परवानगी दिली आहे. कोल्हापूरमधील सौरभ कसबेकर आणि सांगली मधील मुलगी उत्कर्षा दोघेही बुधगाव-सांगली येथील वसंतरावदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सिव्हिल डिपार्टमेंटमधून शिक्षण घेत होते. सौरभची आणि उत्कर्षाची शेवटच्या वर्षापर्यंत सुद्धा काही खास ओळख नव्हती. मात्र जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण झाली तेव्हा सौरभच्या घरच्यांनी कोणी असेल तर सांग आम्ही रीतसर बोलणी करु. असे म्हंटल्यानंतर त्याने तात्काळ आमच्या कॉलेजमधील उत्कर्षा नावाची मुलगी आहे असे सांगितले.

सौरभच्या वडिलांनी उत्कर्षाच्या घरी विचारणा केली. मात्र उत्कर्षाच्या घरच्यांकडून कोणताही प्रतिसाद येत नसल्यानं उत्कर्षाच्या मनात घालमेल सुरु झाली. त्यानं तिला लग्नासाठी अनोख्या पद्धतीनं प्रपोज करायचे असे ठरवले होते. त्यानुसार त्याने कोल्हापूर सांगली रोड वर एका फ्लेक्सद्वारे लग्नाची मागणी घातली. अशा अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यानंतर मुलगी सुद्धा लग्नासाठी तयार झाली आणि या होर्डिंग समोर येऊन दोघांनी एकत्र फोटो सुद्धा काढला. या अनोख्या लव्ह स्टोरीची संपूर्ण जिल्ह्यात एकच चर्चा सुरू आहे. 27 मे रोजी दोघांचे लग्न पार पडणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Drop India : आनंद वार्ता! सोने दरात आणखी घसरण होणार, युद्धामुळे अनेक जहाज दुबईत अडकून; ग्राहकांना मोठा दिलासा

T20 WC, IND vs NZ, Final: फायनलसाठी भारतीय संघात होणार मोठा बदल; सूर्यकुमार अन् गंभीर हुकमी एक्का असलेल्या खेळाडूला देणार संधी?

Nagpur doctor arrested: मक्केत नागपूरच्या डॉक्टर-इंजिनिअरला अटक! नमाजदरम्यान घडले नेमके काय? भाषेच्या गैरसमजाने वाढली अडचण

Iran–US War Escalation : ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने दुबईसह अनेक ठिकाणी हल्ले वाढवले, अनेक देशांत मंदीची शक्यता

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नोएल टाटा यांनी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटला दिली भेट

SCROLL FOR NEXT