Ashadhi wari 2024  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi wari 2024 : बंधुभेटीच्या सोहळ्याने वैष्णव गहिवरले;पालख्यांचा पंढरपूर तालुक्यात प्रवेश

ठाकुरबुवांच्या समाधीजवळील तिसरे गोल रिंगण...तोंडलेबोंडलेमधील पुष्पवृष्टी...अन् सायंकाळी झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या बंधुभेटीचा सोहळ्याच्या आठवणी घेत माऊलींचा पालखी सोहळा रविवारी भंडीशेगावमधे मुक्कामी थांबला.

विलास काटे

भंडीशेगाव : ठाकुरबुवांच्या समाधीजवळील तिसरे गोल रिंगण...तोंडलेबोंडलेमधील पुष्पवृष्टी...अन् सायंकाळी झालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपानदेव महाराज यांच्या बंधुभेटीचा सोहळ्याच्या आठवणी घेत माऊलींचा पालखी सोहळा रविवारी भंडीशेगावमधे मुक्कामी थांबला. दरम्यान संत ज्ञानेश्वर आणि संत सोपानदेव यांच्या बंधुभेटीचा सोहळा पाहताना रस्त्याच्या दुतर्फा उभ्या भाविकांनी गहिवरल्या स्थितीत आणि पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत ‘पुंडलिका वरदे हरी विठ्ठल’ असा गजर केला व दोन्ही दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतले. रविवारी(ता.१४)वेळापूरमध्ये पहाटेची महापूजा सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ यांनी केली.

उजाडण्यापूर्वीच सकाळी पावसाच्या सरी अंगावर झेलतच वारकरी आणि दिंड्यांनी वेळापूरचा तळ सोडला. टाळ मृदंगाचा गजर आणि हरिनामाचे गोडवे गात सोहळा मार्गक्रमण करीत होता. काकड्याचे अभंग आळवीत सोहळा पावणे नऊच्या सुमारास ठाकूरबुवांच्या समाधी मंदिराजवळ पोचला. येथे सोहळ्यातील तिसरे गोल रिंगण झाले. अश्वाने चार फेऱ्या‍ मारुन रिंगण पूर्ण करत सोहळ्यातील वाटचालीत रंगत आणली. रिंगणात सोहळाप्रमुख योगी निरंजननाथ, प्रमुख अॅड. राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, मानकरी ऊर्जितसिंह शितोळे सरकार, महादजी शितोळे सरकार, मालक राजाभाऊ आरफळकर, बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार, रामभाऊ चोपदार, उद्धव चोपदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, माजी मंत्री राजेश टोपे, खासदार संजय जाधव आदी उपस्थित होते. रिंगणानंतरच्या उडीच्या कार्यक्रमाने रिंगणाची उत्साहात सांगता झाली.

सकाळी साडेनऊच्या सुमारास पालखीने रिंगणातून मार्गक्रमण सुरू केले. सोहळा दुपारी तोंडले गावात जेवणासाठी थांबला. तोंडलेमध्ये प्रवेश करताच ग्रामस्थांनी मुक्त हस्ते पालखीवर फुलांची पुष्पवृष्टी केली. तोंडलेमधून निघून माऊलींचा पालखी सोहळा सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास दसूर येथे थांबला. त्यानंतर थोड्या वेळातच संत सोपानदेव महाराजांचा पालखी रथ हरिनामाचा गजर करीत तेथे आला. तेथे दोन्ही बंधूंचे पालखी रथ शेजारी शेजारी उभे करण्यात आले. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी एकमेकांना नारळ प्रसाद दिला. हा सोहळा सुरू असताना उपस्थित भाविकांच्या मनात या भावडांचे पूर्वजीवन समोर आले. त्या काळात त्याचे झालेले हाल आठवले. आता दोन्ही भावंडे एकत्र भेटत असल्याचा सव्वा सातशे वर्षानंतर सोहळा पाहताना उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या.

सोपानदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यातील भाविकांनी माऊलींच्या पादुकांचे तर माऊलींच्या सोहळ्यातील वारकऱ्यांनी संत सोपानदेवांच्या पादुकांचे दर्शन घेतले. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराजांसह अनेक पालख्यांनी आज पंढरपूर तालुक्यात प्रवेश केल्याने मोठ्या संख्येने वारकरी एकाच मार्गावर आले.

वाखरीत आज शेवटचे रिंगण

माऊलींच्या पालखी सोहळ्यातील यंदाच्या वाटचालीतील शेवटचे रिंगण सोमवारी (ता. १५) वाखरी येथे होणार आहे. हा सोहळा पाहण्यासाठी वारीत असलेल्या वारकऱ्यांसह पंढरपूर परिसरातील भाविक मोठी गर्दी करतात. वाखरीजवळ उभे आणि गोल अशी दोन रिंगणे होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT