महाराष्ट्र बातम्या

मुझे प्यार हुआ....नवनीत राणा रोमँटिक, पतीदेव लाजले, Video Viral

खासदार नवणीत राणा आणि आमदार रवी राणांनी अनोखा व्हॅलेटाईन डे साजरा केला आहे.

सकाळ डिजिटल टीम

आज देशासह जगभरात प्रेमीयुगुल व्हॅलेंटाईन डे साजरा करताना दिसत आहेत. अशातच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणांनी अनोखा व्हॅलेटाईन डे साजरा केला आहे. त्यांचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होताना दिसत आहे. त्यांच्या या रोमँटिक व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत.

नुकतचं नवनीत राणा यांनी आपल्या इंस्टा अकाऊंटला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ एखाद्या कॅफेमधील असल्याचे पाहायला मिळत आहे. भली मोठी पोस्ट शेअर करत राणा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

आज व्हॅलेंटाईन डे असल्यामुळे या दोघांनी एकत्र येण्याचे ठरविले होते. यावेळी, राणा यांची नाराजी मी कॉफीने दूर केली. असी माहिती रवी राणा यांनी दिली.

व्हिडीओमध्ये नवनीत राणा स्वतः गुलाबाचं फुल घेऊन येतात आणि आपल्या पतीला देतात. त्यावेळी रवी राणादेखील गुलाबाचं फुल देऊन प्रेम व्यक्त करताना पाहायाला मिळतात. या रोमँटिक क्षणाला राणा यांनी मुझे प्यार हुआ था... या गाण्याची जोड दिली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

रवी राणा आणि नवनीत यांची ओळख २००९ ते २०११ च्या दरम्यान मुंबईत झाली. रवी राणा यांचे भाऊ सुनील राणा यांनी सांगितलं की २००९ मध्ये पहिल्यांदाच रवी राणा हे बडनेरातून आमदार झाले. रवी आणि नवनीत यांची ओळख बाबा रामदेव यांच्या शिबीरातून झाली होती.

त्यावेळी रवी राणा आमदार होते तर नवनीत कौर या अभिनेत्री, मॉडेल होत्या. दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आणि भारतीय सिनेसृष्टीत नवनीत यांनी काम केलं आहे. रामदेवबाबांच्या योग शिबिरात या दोघांची ओळख झाली.

या ओळखीचं रूपांतर पुढे मैत्रीत आणि त्यानंतर प्रेमात झालं. त्या दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न साधेपणाने करायचं असा निर्णय रवी राणा यांनी घेतल्याचं त्यांच्या भावाने म्हणजेच सुनील राणा यांनी म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

SCROLL FOR NEXT