Sharad Pawar Lovestory  
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar Lovestory : पत्नीने नेसलेल्या प्रत्येक साड्यांची निवड खुद्द शरद पवार करतात, वाचा पवारांची अनोखी लव्हस्टोरी

वर्ष होतं १९६७ चं. हे वर्ष त्यांच्या साठी खूप खास होतं कारण या वर्षीच त्यांना आमदारकी लाभली आणि त्यांच्या आयुष्यात प्रतिभाताई आल्या.

सकाळ डिजिटल टीम

सध्या वॅलेंटाईन डे जोमाने सुरू आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला एका अशा राजकारणी व्यक्तीची लव्हस्टोरी सांगणार आहोत ज्यांचा महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठा हात आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणक्य समजले जाणारे शरद पवार यांची राजकीय जीवन सर्वांसमोर उघड आहे पण तुम्हाला त्यांच्या वैवाहीक आयुष्याविषयी माहिती आहे का? आज आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. (valentine week ncp leader sharad pawar spouse wife pratibha pawar love story married life story )

वर्ष होतं १९६७ चं. हे वर्ष शरद पवारांसाठी खूप खास होतं कारण या वर्षीच त्यांना आमदारकी लाभली आणि त्यांच्या आयुष्यात प्रतिभाताई आल्या. आमदारकी मिळाल्यानंतर त्यांना प्रतिभाताईचं स्थळ आलं होतं.

शरद पवारांचे मोठे भाऊ माधवराव पवार यांचे घनिष्ठ मित्र अरविंद राणे यांची भाची ही प्रतिभा. सदू शिंदे या प्रसिद्ध माजी कसोटी क्रिकेटपटू यांची कन्या.अरविंद राणे यांनीच शरद पवारांसाठी प्रतिभा यांचं स्थळ सुचवलं.

मात्र नुसतीच आमदारकी हाती आल्याने शरद पवार लग्नासाठी तयार नव्हते. मात्र आईच्या आग्रहाखातर मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठरला पण आश्चर्याची बाब म्हणजे तिथे जाऊन मुलगी बघणे सोडून शरद पवार वर्तमानपत्र वाचत बसले होते. असं म्हणताता त्यांनी प्रतिभाताईंना पाहले सु्द्धा नाही आणि लग्नाला होकार दिला.

१ ऑगस्ट १९६७ रोजी शरद पवार व प्रतिभा पवार लग्नबंधनात अडकलेलग्न यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक आल्यानंतरच लावायचं असं ठरलं होतं. त्यामुळे लग्नाच्या दिवशीहीशरद पवार कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.

अखेर संध्याकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक लग्नमंडपात आल्यानंतर शरद पवार व प्रतिभा पवार यांचा विवाह पार पडला. विशेष म्हणजे लग्न झाल्यानंतर प्रतिभा पवार शरद पवार यांना म्हणाल्या होत्या की आणखी दहा मिनिटं उशीर झाला असता तर त्या तिथेच कोसळल्या असत्या.

शरद पवार आणि प्रतिभा पवार यांना एक मुलगी आहे सुप्रियाताई. त्या सुद्धा वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून राजकारणात उतरल्या आहे. सध्या त्या राष्ट्रवादीच्या खासदार आहे. शरद पवार आणि प्रतिभाताई यांच्या ५६ वर्षाच्या संसारात अनेक चढ उतार आले.

कधी राजकारणात तर कधी वैयक्तीक आयुष्यात पण प्रतिभाताई खंबीरपणे त्यांच्यासोबत राहल्या. राजकारणातील सत्तापालट असो की, शरद पवारांचं आजारपण त्या नेहमीच तटस्थ खंबीर राहल्या.

एका मुलाखतीत बोलताना शरद पवार म्हणाले होते की माझ्या बायकोने नेसलेल्या प्रत्येक साड्यांची निवड मी करतो. त्यावरुन त्याचं प्रतिभाताईविषयीचं प्रेम प्रखरपणे दिसून येतं. वेळोवेळी शरद पवारांनी त्यांच्या बोलण्यातून प्रतिभाताईविषयीचं प्रेम व्यक्त केलंय. जसे शरद पवार हे प्रत्येक राजकीय व्यक्तीसाठी आदर्श आहे तसेच त्यांची ही जोडी सुद्धा प्रत्येक व्यक्ती एक आदर्श आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramdas kadam : रामदास कदम यांचा आणखी एक खळबळजनक दावा, थेट उद्धव ठाकरेंना आव्हान

Crime News : गोळीबार प्रकरण: पंचवटी पोलिसांकडून १४वा संशयित जेरबंद, आतापर्यंत माजी नगरसेवकासह १४ अटकेत

World Cup 2025: भारताविरुद्ध पाकिस्तानने टॉस जिंकला, प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल; हस्तांदोलन झालं की नाही?

Sangli Accident Death : काम संपवून घरी निघाला होता, समोरू दुचाकी आली अन् दोघेही जाग्यावर संपले; सांगलीतील घटना

Latest Marathi News Live Update:परबांनी बिल्डरांकडून मर्सिडीज घेतली की नाही, नार्को टेस्टही हवी : रामदास कदम

SCROLL FOR NEXT