pune vasant more  
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: वसंत मोरेंना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर, बारामतीमध्ये सुळेंना पाठिंबा

Pune Vasant More: वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे वसंत मोरे यांना वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात तिरंगी लढत होईल हे आता निश्चित झालं आहे. (Vanchit Bahujan Aaghadi declare its third list of candidates from Maharashtra )

पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यास वसंत मोरे ठाम होते. त्यांनी शरद पवारांशी चर्चा करुन चाचपणी केली होती. वंचितच्या प्रमुखांशीही त्यांची चर्चा सुरु होती. कोणाकडून उमेदवारी न मिळाल्यास अपक्ष लढण्याची देखील त्यांची तयारी होती. पण, त्यांना वंचितने संधी दिली आहे. वंचित आघाडीच्या अधिकृत अकाऊंटवरुन याची घोषणा करण्यात आली आहे.

वंचितने आपल्या तिसऱ्या यादीमध्ये पाच उमेदवारांनी नावे जाहीर केली आहे. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांच्या बारामतीमधील उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. याचा अर्थ त्यांचा विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना पाठिंबा असणार आहे. वंचितने नांदेड, परभणी, औरंगाबाद, पुणे, शिरुर या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केलेत.

वंचितचे तिसऱ्या यादीतील उमेदवार

१. अविनाश भोसिकर - नांदेड (लिंगायत)

२. बाबासाहेब भुजंगराव उगले- परभणी (मराठा)

३. अफ्सर खान- औरंगाबाद (मुस्लिम)

४. वसंत मोरे - पुणे (मराठा)

५. मंगलदास बागुल - शिरुर (मराठा)

तात्याचं ठरलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढणार नसल्याने वसंत मोरे नाराज होते. त्यांना पुण्याची लोकसभा लढवायची होती. त्यामुळेच त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गेल्या काही दिवसांत ते अनेक नेत्यांच्या संपर्कात होते. अखेर त्यांना वंचितने लोकसभेचं तिकीट दिलं आहे. पुण्यात वसंत मोरे काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांना चांगली फाईट देतील असं बोललं जातंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा; 'ही' मागणी पूर्ण झाली तर दीर्घकालीन प्रतीक्षा संपणार

IPS बुशरा बानो कोण? इन्शाल्लाह म्हटल्यानं वाद, तक्रारीनंतर तडकाफडकी बदली

Solapur News : वित्त आयोग निधी वाटपात पालकमंत्र्यांची मनमानी; जिल्हा परिषद सदस्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे केली तक्रार

IPL 2027 Auction कुठे होणार? मागील काही वर्षांत दुबई, जेद्दाह, अबु धाबी येथे झाला होता लिलाव; यावर्षी...

Marathi News Live Updates : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री शिंदेंच्या निवासस्थानी, गणपतीचं घेतलं दर्शन

SCROLL FOR NEXT