महाराष्ट्र बातम्या

वंचित बहुजन आघाडी शिवसेनेत प्रवेश करणार?

धनश्री ओतारी

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या सुषमा अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशानंतर राजकीय वर्तुळात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. असे मोठे विधान शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलं आहे.(vanchit bahujan aaghadi to join shivsena mp Vinayak Raut )

विनायक राऊत सध्या सोलापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. रिपब्लिकन पक्षाचे अनेक गट, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन समर्थन दर्शवलं आहे. त्यामुळे संपूर्ण वंचित बहुजन आघाडी पक्ष शिवसेनेत येण्याच्या मानसिकतेमध्ये असल्याचे विनायक राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीलच आहे. त्यामुळे एकत्र यायचं असेल तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ‘मातोश्री’वर येऊन उद्धव ठाकरे यांच्यासोबत बोलावं. मातोश्रीचे दरवाजे सर्वांसाठी कायमच उघडे आहेत, असेही विनायक राऊत यांनी या वेळी स्पष्ट केले.

विनायक राऊत हे आज आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे विनायक राऊत हे आमदार शहाजीबापू पाटलांवर काय तोफ डागतात, हे पाहणं उत्सुत्याचे ठरणार आहे.

सुषमा अंधारेंनी गाजवल्या होत्या राष्ट्रवादीच्या सभा

2019 च्या विधानसभा निवडणुकीत सुषमा अंधारेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभा गाजवल्या होत्या. राष्ट्रवादीच्या त्या स्टार प्रचारक होत्या. जितेंद्र आव्हाडांच्या प्रचारासाठी त्यांनी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरेंवर अत्यंत गंभीर टीका केली होती. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT