Vanchit Bahujan Aghadi Chief Prakash Ambedkar esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar : 'वंचित'ला इंडिया आघाडीत घेण्यास शरद पवारांचा की भाजपचा विरोध? प्रकाश आंबेडकरांचा थेट सवाल

वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास शरद पवारांचा (Sharad Pawar), की भाजपचा विरोध हे समजून घ्यायला हवे.

सकाळ डिजिटल टीम

'आमच्याकडून एमआयएमचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत. त्यांच्यासारखा मूर्ख पक्ष नाही.'

सातारा : वंचितला इंडिया आघाडीत घेण्यास शरद पवारांचा (Sharad Pawar), की भाजपचा विरोध हे समजून घ्यायला हवे. आम्हाला इंडिया आघाडीत घेतले नाही, तर मोदी ‘इंडिया’ला (India Alliance) ठेवणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिला आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्यास सर्व तात्पुरत्या कर्मचाऱ्यांना कायम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ॲड. आंबेडकर यांनी आज साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.

इंडिया आघाडीत सहभागी होणार का, या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘इंडिया आघाडी शेवटपर्यंत टिकावी ही अपेक्षा आहे. वंचित आघाडी इंडियाचा घटक व्हावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अदाणींची अर्थव्यवस्था देशाला धोकादायक आहे, अशी मांडणी राहुल गांधींनी मुंबईतील बैठकीत केली होती. याला सर्वांनी पाठिंबा दिला.

मात्र, राष्ट्रवादीने अदाणींसोबत असल्याचे दाखवून दिले आहे. त्यामुळे जे धोक्याच्या अर्थव्यवस्थेसोबत आहेत, ते इंडिया आघाडीत राहू शकत नाहीत, अशी भूमिका राहुल गांधी घेतील का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. हा विषय सुटला नाही तर मोदी याचा फायदा उठवू शकतात. इंडिया आघाडीत आम्हाला घ्यायला शरद पवार यांचा, की भाजपचा विरोध हे समजून घ्यायला हवे.’’

आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हेही कंत्राटपद्धतीने भरायला सुरवात करा, असे सांगून ते म्हणाले, ‘‘नोकर भरतीत टीसीआय कंपनीला १२० कोटींचा नफा झाला आहे. ज्यांचे अर्ज बाद होतील, त्यांचे एक हजार परत देणार का, हा प्रश्न आहे. कंत्राटी पद्धतीला परवानगी नाही. ही पद्धत बेकायदेशीर असून, हे सरकारही पूर्णपणे फ्रॉड आहे.’’

नांदेड विषयावर ते म्हणाले, ‘‘डिसेंबरनंतर औषधे खरेदी करू, असे मुख्यमंत्री सांगत असले, तरी तीन महिने रुग्णालयांचे काय होणार, असा प्रश्न करून या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?’’ महिला आरक्षणाबाबत ते म्हणाले, ‘‘पहिल्यांदा जनगणना झाली पहिजे. मुळात लोकसभा व विधानसभेत २०३५ नंतरच महिलांचे आरक्षण लागू होईल.’’

एमआयएमचे दरवाजे बंद केले...

आमच्याकडून एमआयएमचे दरवाजे पूर्णपणे बंद आहेत. त्यांच्यासारखा मूर्ख पक्ष नाही. औरंगाबाद हा भाजप व शिवसेनेचा गड असताना पाच उमेदवार असूनही इम्तियाजला मुस्लिम समाजाबरोबरच हिंदूंनी जिंकून दिले. एक मुस्लिम उमेदवार गडात जिंकतो हे देशभर जायला हवे होते, असे आंबेडकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Rajgad News : वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड तालुका; ढोल ताशांच्या गजरात राजगडच्या मावळ्यांचा जल्लोष

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेसच्या माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; पदाधिकाऱ्यांच्या पक्षत्यागावर संतोष केणेंचा माजी आमदारांवर थेट आरोप, म्हणाले...

Maharashtra Latest News Update: माटुंगा पोलिसांच्या थरारक कारवाईत दरोड्यातील मुख्य आरोपी अटक

SCROLL FOR NEXT