Vanchit Bahujan Aghadi vs Shiv Sena esakal
महाराष्ट्र बातम्या

Vanchit Bahujan Aghadi : महाविकास आघाडीकडून वंचितला 2 जागा? रेखा ठाकूर यांनी व्यक्त केली नाराजी; लिहिलं सविस्तर पत्र...

राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचा लोकसभेच्या जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या बार्गेनिंगमुळं याला उशीर होत असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता एक महत्वाची माहिती समोर आली असून त्यानुसार, वंचितला मविआनं केवळ २ जागा दिल्याची चर्चा आहे.

वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी यासंदर्भात एका पत्राद्वारे संताप व्यक्त केला असून येत्या ९ मार्चच्या बैठकीत यावर साकारात्मक चर्चा कराल अशी अपेक्षा त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडं व्यक्त केली आहे. तसेच आपली युती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे, याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत, असंही त्यांनी म्हटलं आहे. (Vanchit Bahujan Aghadi got 2 seats from MVA Rekha Thakur expressed disfavour)

रेखा ठाकूर यांनी लिहिलेलं पत्र जसच्या तसं...

उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार आणि बाळासाहेब थोरात

सस्नेह जयभीम,

६ मार्च, २००२४ रोजी फोर सिझन्स, वरळी येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकी संदर्भात हे अतिशय महत्वाचे पत्र भी आपणा विद्यांना वचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने लिहित आहे. महाविकास आपाडीच्या बैठकीस बाळासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ मोकळे, राज्य उपाध्यक्ष हजर होते.

राज्य कार्यकारिणीला मिळालेल्या माहितीवरून असे दिसून येत आहे की महाविकास आघाडीच्या अंतर्गत जागावाटप अद्याप प्रलंबित आहे. ह्यात भारतीय राष्ट्रीय कॉग्रिस आणि शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) यांचा १० जागांवर आणि तीनही पक्षात ५ जागांवर अशा एकूण ४८ पैकी १५ जागांवर निर्णय होत नाही (tie आहे) अशी परिस्थिती आहे.

भाजप-आरएसएसच्या नीच विभाजनकारी आणि लोकशाही विरोधी अजेंड्यांविरुद्ध सातत्याने ठामपणे आणि बेधडकपणे उभा असलेला आमचाच पक्ष आहे. आम्ही जागा वाटपाच्या बाबतीत महाविकास आघाडीचे दिरंगाईचे धोरण आणि अनिर्णायक दृष्टिकोनाबद्दल चिठित आहोत. २ फेब्रुवारी आणि २७ फेब्रुवारी च्या बैठका नंतरच्या महाविकास आघाडीच्या अंतर्गत चर्चेत आम्हाला वगळले गेले, महाविकास आपाडीची ही संघपणाची आणि आम्हाला टाळण्याची भूमिका असली तरीही महाविकास आघाडी बदल आम्ही सकारात्मक आहोत, २०१८ साली झालेल्या पक्ष स्थापनेपासून, वंचित बहुजन आघाडीचा पाया दलित, आदिवासी, बहुजन, भटके विमुक्त, गरीब पराठा आणि मुस्लीम समूहांमध्ये वेगाने विस्तारत असतांना महाबिकास आघाडीच्या बैठकीत बंचित बहुजन आघाडीला केवळ २ जागा देऊ केल्या

हे मतदारसंघ ज्या जिल्ह्यातील आहेत तेथील आमच्या जिल्हा कार्यकारिणी बरोबर चर्चा केली असता असे जाणवले की, ह्या मतदारसंघात आमचे काम असले तरी महाविकास आघाडीचे अस्तित्व कमी आहे आणि त्यांना ह्या मतदार संघात जनाधार कमी आहे आणि त्यामुळे पंचित बहुजन आपाहीसाठी ही बाब अडचणीची व प्रासदायक आहे. तसेच हे अधोरेखित केले पाहीजे की मागील २-३ निवडनुकामध्ये महाविकास आघाडीच्या पटक पक्षापैकी कोणीही ह्या जागा जिंकलेल्या नाहीत, जाणीवपूर्वक 'हरणाऱ्या जागा वचित बहुजन आपाहीला धावच्या आणि उर्वरित मतदारसंघात वचित बहुजन आघाडीच्या लक्षणीय मतदाराचा पाठींबा मिळवायचा हा हेतू महाविकास आश्यादीच्या पदक पक्षांचा आहे असे वंचित बहुजन आपाडीच्या जिल्लाले आहे आपली लक्षणीय मते हवीत पन हिंदू शकणाऱ्या जागा वचित बहुजन आधाडीला द्यायच्या नाहीत हेच मी आचे धोरण आहे हा यह कार्यकत्यांचा होत आहे.

बंचित बहुजन आघाडीला सन्मानजनक (संख्या) आणि जिंकण्याची शक्यता असणान्या जागा द्याव्यात, महाविकास आघाडीला टाकाऊ वाटणाऱ्या जागा नकोत ही वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची विनंती आहे. आज शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी कॉग्रेस (शरदचंद्र पवार) हे दोन्ही पक्ष विभाजित झालेले पक्ष आहेत. आणि कॅप्रिंसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक नेते भाजप मध्ये गेले आहेत आणि काही वाटेवर आहेत. ह्या पार्श्वभूमी वर महाविकास आघाडीने फक्त स्वत:च्या फायद्याच्या भूमिकेतून न बघता वंचित बहुजन आघाडी कडे वंचित समूहांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करणारी एक सक्षम राजकीय शक्ती म्हणून बघणे महत्वाचे आहे.

'वंचित बहुजन आपाड़ी हा आदर देण्याच्या योग्यतेचा पक्ष नाही का?' हा प्रश्न मी बंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने तुम्हा तियां समोर मांडत आहे. आम्ही महाविकास आयाढीचा आदरच करतो, पण सातत्याने चचेतून बाहेर ठेवण्याच्या भूमिके मुळे महाविकास आघाडीला आपली मते हवीत पण आपला सन्मान ठेवला जात नाही ही भावना निर्माण होत आहे. वंचित बहुजन आघाडीची मते हवीत परंतू वंचित बहुजन आपाड़ो हा पक्ष नको अशी ही भूमिका आहे.

आपण ठरवून आपापसात बर्चा करावी व ९ फेब्रुवारीच्या बैठकीत तुमची भूमिका मांडावी, आपण बदलाल ही अशा आहे. आपली सुती भक्कम व टिकाऊ करण्याचा आमचा प्रयत्न आहे याची आम्ही तुम्हा तिघांना खात्री देत आहोत.

रेखा ठाकुर, प्रदेशाध्यक्ष

वंचित बहुजन आघाडी

महाराष्ट्र प्रदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT