महाराष्ट्र बातम्या

प्रकाश आंबेडकर विधीमंडळाबाहेर; आंदोलनकर्ते, पोलिसांत राडा

प्रकाश आंबेडकर यांनी आमचं आंदोलन शांततेत सुरु असल्याचं सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

प्रकाश आंबेडकर यांनी आंदोलन शांततेत सुरु असल्याचं सांगितलं आहे.

ओबीसींची ओबीसींची जातनिहाय मोजणी करण्यात यावी या मागणीसाठी आज वंचित बहुजन आघाडी आक्रमक झाली आहे. मुंबईतील आझाद मैदान येथे आज वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हो मोर्चा काढण्यात आला. यावेळी वंचितच्या कार्यकर्ते आणि पोलिस आमनेसामने आल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आमचं आंदोलन शांततेत सुरु असल्याचं स्पष्ट केलं आहे.

यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले, या शासनानं ओबीसी आरक्षणाचं फिडिंग केलं नाही. यामुळ ओबीसी आरक्षण धोक्यात आलं आहे. सरकारनं ओबीसी आरक्षणाची योग्य पद्धतीनं बाजू मांडेलेली नाही. यासाठी जी ४५० कोटीची तरतूद केली आहे, तसा कायदा नाही. अधिवेशन सुरु आहे. यात सेन्सस करणारा कायदा केला पाहिजे. तो कायदा करून सेन्सस कमिशनकडे हे पैसे वळवले तर सेन्सस सुद्धा ओबीसीची जातनिहाय संख्या देऊन सर्वोच्च न्यायालयात ते सादर करु शकते. परंतु शासनाचा हेतु खोटा आहे. ज्या पद्धतीने त्यांनी मराठ्यांच आरक्षण संपवलं तसंच ते ओबीसींचं आरक्षणही संपुष्टात आणणार आहेत. आंदोलन सुरु ठेवणार आहात का ? या प्रश्नावर ते म्हणाले, आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे, आम्ही ते करणार. हे आंदोलन शांततेत करत आहोत, ते सुरु राहणार आहे. मात्र पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे. तरीही आंदोलन सुरु राहणार आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhishek Banerjee Attack : अभिषेक बॅनर्जींवर जीवघेणा हल्ला; विटा-दगडं फेकत डोळे आणि छातीवर वार, ममता बॅनर्जींचा भाजपवर गंभीर आरोप, म्हणाल्या, सत्ताधारी खुनी...

Pune News: हिंजवडीतील IT कंपनी अचानक बंद? पगार नाही, चेक बाऊन्स... ७०० इंटर्न आणि कर्मचाऱ्यांचा वेतन घोटाळा उघड

Hero New Bike : पेट्रोल पंपावर जायचं विसरा! लॉन्च झाली Hero ची दमदार बाइक; 72km मायलेजसह जबरदस्त स्मार्ट फीचर्स, किंमत फक्त...

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Akola RSS Office Attack Case: आरएसएस कार्यालय हल्ला प्रकरणात आमदार साजिद खान पठाण यांच्यासह १२ जणांची १६ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT