वंदे भारत रेल्वे sakal media
महाराष्ट्र बातम्या

‘कवच’मुळे ‘वंदे भारत’ला अपघाताचा धोका नाहीच! ताशी १८० किमीचा वेग; पहिल्या दिवशी पुण्यापर्यंतच धावणार

'वंदे भारत'चा वेग ताशी १८० किमी आहे. ॲक्सलरेशन १२९ सेकंदात १६० किमी वेग आहे. या एक्स्प्रेसला ‘कवच’ नावाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाड्या आल्यास तीन किलोमीटर अगोदरच समजते. गाडीला ब्रेक लावला जातो. त्यामुळे अपघात टाळता येतो.

तात्या लांडगे

सोलापूर : वंदे भारत एक्स्प्रेसचा वेग ताशी १८० किमी आहे. ॲक्सलरेशन १२९ सेकंदात १६० किमी वेग आहे. या एक्स्प्रेसला ‘कवच’ नावाची अत्याधुनिक यंत्रणा आहे. त्यामुळे एकाच ट्रॅकवर समोरासमोर गाड्या आल्यास तीन किलोमीटर अगोदरच समजते आणि गाडीला ब्रेक लावला जातो. त्यामुळे अपघात टाळता येतो, अशी यंत्रणा ‘वंदे भारत’मध्ये कार्यान्वित केलेली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसच्या प्रत्येक डब्यात आणि इंजिनसमोर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गाडीतील स्वच्छतागृहांचा वापर सर्वसामान्यांसह दिव्यांग प्रवाशांनाही सहजपणे करता येईल, अशी त्याची रचना करण्यात आली आहे. स्वच्छतेला प्राधान्य हे ‘वंदे भारत’चे प्रमुख वैशिष्ट आहे. दरम्यान, १० फेब्रुवारीला सोलापूर रेल्वे स्थानकावरून वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी पुण्याकडे रवाना होईल.

पहिल्या दिवशी पुण्यापर्यंत गाडी धावणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. त्यानंतर पुढील आदेशानुसार रेल्वे सोलापूर-पुणे-मुंबई अशी धावेल. दरम्यान, या गाडीचा ताशी वेग १८० किमी असला, तरीदेखील सोलापूर-पुणे-मुंबई या मार्गावर १२० किमी वेगानेच वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहे. इतर रेल्वे गाड्यांच्या तुलनेत ‘वंदे भारत’च्या तिकिटाचा दर जास्त आहे. पण, प्रवाशांसाठी सुविधा अधिक आहेत.

सोलापूर-मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेसला १० फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतून हिरवा झेंडा दाखवतील. त्यासाठी रेक बुधवारी सकाळी चेन्नईहून मुंबईला गेला आहे. गुरुवारी (ता. २) पहाटे तीनच्या सुमारास ही गाडी सोलापूर रेल्वे स्थानकावर दाखल झाली. सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी ही गाडी पुण्याच्या दिशेने गेली.

मुंबईसाठी तेराशे ते २३६५ रुपयांचे तिकीट

सोलापूर ते पुण्यापर्यंत २६२ किलोमीटरच्या अंतरासाठी ‘वंदे भारत’ला एक्झिक्युटिव्ह डब्यातील प्रवासाला एक हजार ५१० रुपयांचा तिकीट दर आहे. तर चेअर कारमधील प्रवासाला पुण्यापर्यंत ७७५ रुपये मोजावे लागतील. सोलापूर-मुंबई हा ४५३ किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या प्रवाशाला एक्झिक्युटिव्ह डब्यासाठी दोन हजार ३६५ रुपये तर चेअर कारसाठी तेराशे रुपये द्यावे लागतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Real Estate Development : २०१६ ते २०२६ दरम्यान पिंपरी चिंचवडचे चित्र बदलले; शेतजमिनी कमी होऊन टोलेजंग इमारतींची संख्या वाढण्यामागे काय?

Shankar Maharaj Math : धनकवडीतील शंकर महाराज मठाच्या अन्नछत्राला एफडीएचा दणका; परवाना मिळेपर्यंत व्यवसाय बंद

Tata Group: टाटा समूहात खळबळ! रतन टाटा यांचे सख्खे भाऊ जिमी टाटा यांचे नोएल टाटांवर गंभीर आरोप; म्हणाले...

IPL Retaintion झालं, आता लिलावापूर्वी कोणत्या संघाकडे किती पैसे अन् खेळाडूंची जागा शिल्लक? पाहा यादी

Pimpri Cyber Police : सायबर गुन्हेगारांना १२ हजार बनावट सिमकार्डचा पुरवठा; पिंपरी पोलिसांची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT