Ashadhi Wari 2024 sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Wari 2024 : पिराची कुरोलीत विसावला पालखी सोहळा

पालखी सोहळ्यात सहभागी होऊन परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेला वारकरी वर्षभराची आत्मिक समाधानाची ऊर्जा घेऊन जातो. असा हा संत तुकोबारायांचा सोहळा रविवारी पिराची कुरोलीत सायंकाळी विसावला.

सकाळ वृत्तसेवा

राजेंद्रकृष्ण कापसे

पिराची कुरोली : पालखी सोहळ्यात सहभागी होऊन परमात्मा पांडुरंगाच्या दर्शनाला निघालेला वारकरी वर्षभराची आत्मिक समाधानाची ऊर्जा घेऊन जातो. असा हा संत तुकोबारायांचा सोहळा रविवारी पिराची कुरोलीत सायंकाळी विसावला. ध्यानीं मनी पांडुरंग असल्याने पंढरी समीप आल्याने केलेला धावा... त्यानंतर झालेली संतभेट आणि पंढरपूर तालुक्यात झालेला प्रवेश अशी आजच्या दिवसाची वाटचाल होती.

आणीक दुसरें मज नाहीं आतां ।

नेमिलें या चित्तापासुनियां॥

पांडुरंग मनीं पांडुरंग ध्यानीं ।

जाग्रतीं स्वप्नीं पांडुरंग ॥

संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना देहू संस्थांन व बोरगाव ग्रामस्थांच्या वतीने पहाटे अभिषेक केला. सोहळा माळखांबीलाकडे निघाला. सकाळच्या वाटचालीतील अवघ्या चार किलोमीटरचे अंतर पार केले की, पालखी साडेआठ वाजता माळखांबीला पोचली. यावेळी पालखीवर क्रेनच्या साहाय्याने पुष्पवृष्टी करण्यात आली. येथेच दुपारचे जेवण झाले. दरवर्षी प्रमाणे ग्रामस्थांच्या वतीने पूजा झाली. त्यानंतर अकरा वाजता सोहळा बोंडले गावाकडे मार्गस्थ झाला. माळखांब छोटे गाव असल्याने दिंड्या पुढे येऊन थांबतात.

तुका म्हणे धावा

बोंडले गावाच्या हद्दीत सोहळा आला. त्यावेळी उखळी तोफांची सलामी देऊन जंगी स्वागत केले. गावाच्या अलीकडे कालव्याच्या पुलापासून जाताना मोठा उतार आहे. तेथे नगारखाना आणि अश्व बारा वाजता पोचले. काका चोपदार यांनी अश्व व दिंड्या थांबविल्या. त्यातील एक एक दिंड्यांना संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील तुका म्हणे धावा । आहे पंढरी विसावा ।। असे म्हणत रथापुढील २६ दिंड्या सोडले. साडेबारा वाजता श्रीतुकोबारायांची पालखी देखील धावत बोंडले गावात पोचले. यावेळी, दुपारी एक वाजता संत सोपानकाका, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांची भेट झाली. यावेळी, दोन्ही पालख्यांतील विश्‍वस्तांनी एकमेकांचे श्रीफळ आणि उपरणे देऊन स्वागत केले.

सर्व भाग्यहीन ।

ऐसें सांभाळिलों दीन ॥

पायीं संतांचे मस्तक ।

असों जोडोनि हस्तक ॥ अशा बोंबले ग्रामस्थांच्या भावना होत्या. त्यांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. येथे विसावा घेऊन सोहळा मार्गस्थ झाला. भाळवणी टप्पा ओलांडून पालखी सोहळ्याने पंढरपूर तालुक्यात प्रवेश केला. मुख्य रस्ता सोडून सोहळा आतील बाजूस दोन‌ किलोमीटर अंतर आत पिराची कुरोली येथे विसावला. मंगळवारी सोहळा पंढरपुरात पोचेल.

उद्या मालक देहूकरांचे कीर्तन

रविवारी वारी रात्री हराळकर दिंडीच्या वतीने कीर्तन व जागर झाला. तर सोमवारी सकाळी सात वाजता मालक देहूकरांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर बारा वाजता सोहळा मार्गस्थ होईल. उद्या बाजीराव विहीर येथे दुसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर सोहळा वाखरीच्या पालखी तळावर विसावणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडी आक्रमक, राहुल गांधींसह ११ नेत्यांनी दाखल केली याचिका, सुनावणी कधी?

Laptop Mobile Cleaning Tips: मोबाईल बाथरूमपासून बेडरूमपर्यंत कुठेही नेता? मग जंतूंचा संपर्क कमी करण्यासाठी स्वच्छतेच्या 'या' टिप्स वापराच

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे अजूनही सर्वोच्च न्यायालयात, इंडिया आघाडीचे नेतेही उपस्थित

रेल्वे प्रवासात प्रवाशांची घुसमट, अपुऱ्या सुविधांमुळे दररोज गर्दीशी सामना; अतिरिक्त लोकलची मागणी

मायकल जॅक्सनला टिळा लावून स्वागत करणारी एकमेव अभिनेत्री; कसा होता तो अनुभव? सोनाली बेंद्रे म्हणाली- मी कधीच.

SCROLL FOR NEXT