वर्षा गायकवाड
वर्षा गायकवाड 
महाराष्ट्र

शिक्षणमंत्र्यांची गुडन्यूज; काहीही झालं तरी शाळा अंधारात जावू देणार नाही!

सकाळ डिजिटल टीम

शाळांसाठी अनुदानित वीज देण्याच्या धोरणावरही सरकार काम करत आहे.

मागील काही दिवसांपासून राज्यात खंडीत वीजपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. यावरून वेळोवेळी राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत पुरवठा सुरळीत होण्यासाठी पाठपुरावा करत असल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, आता एक वेगळी बातमी समोर येत आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट्द्वारे राज्यातील शाळांना महाराष्ट्र सरकारने अखंड वीजपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती दिली आहे. शाळांसाठी अनुदानित वीज देण्याच्या धोरणावरही सरकार काम करत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता राज्यातील शाळांना खंडीत वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही.

राज्यातील काही प्रदेशात मागील काही दिवसांपासून खंडीत वीजपुरवठ्यामुळे नागरिकही त्रस्त झाले आहेत. प्रशासनाने यावर तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्री गायकवाड यांनी जितक्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा असतील, त्यांची वीज कधीच कापली जाणार नाही, अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. वीज बिलापोटी यावर्षी शासनाने १४ कोटी रुपये दिले आहेत. अर्थमंत्री अजित पवार यांनी आणखी एक निधी लागला तर पुरवणी मागणी दाखल करून ती मंजूर करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय शाळेला कोणत्या सवलतीच्या दरात वीज पुरवठा मिळवा यासाठीही प्रशासन प्रयत्न करत आहोत असेही त्या म्हणाल्या आहेत.

दरम्यान, राज्यात वीज निर्मिती करण्यासाठी लागणाऱ्या कोळशाचा तुटवडा निर्माण झाल्याने राज्य लोड शेडिंगच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक वीज निर्मीती केंद्रावर दोन ते तीन दिवस कोळसा पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे. वीज निर्मीतीमध्ये महत्वाच्या असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा 17 ते 18 दिवस पुरेल इतकाच वीज निर्मितीचा पाणी साठा उपलब्ध आहे. खाजगी कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. दररोज 20 ते 22 हजार मेगावॉट वीजेची राज्याला गरज असताना आता 28 हजार मेगावॉटची मागणी होत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Video : नरेंद्र मोदींनी काढली बाळासाहेब ठाकरेंची आठवण; म्हणाले, डीएमकेचे लोक सनातन धर्माला डेंग्यू म्हणत आहेत...

IPL 2024 DC vs MI Live Score : दिल्लीने राखला घरचा गड! तिलक वर्मा शेवटपर्यंत लढला, मात्र मुंबईच्या पदरी पराभवच

PM Modi Kolhapur Rally: पंतप्रधान मोदींच्या सभेला संभाजी भिडेंची हजेरी; मोदींचं कोल्हापुरकरांना पुन्हा सत्तेत आणण्याचं केलं आवाहन

Tristan Stubbs DC vs MI : 4,4,6,4,4,4 एकाच षटकात होत्याचं नव्हतं झालं! स्टब्सच्या तडाख्यात वूडची शकलं

Latest Marathi News Live Update : एक सच्चा देशभक्त संसदेत पोहोचणार आहे- आशिष शेलार

SCROLL FOR NEXT