varsha gaikwad says school permeation will be canceled in case of cheating in exam
varsha gaikwad says school permeation will be canceled in case of cheating in exam  
महाराष्ट्र

'तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

सध्या दहावीच्या परीक्षा सुरु असून औरंगाबाद जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आणि इतर कर्मचारी हेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी विधान परिषदेत बोलताना त्या शिक्षण संस्थेवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.

परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये, परीक्षा सुरळीत आणि योग्य पध्दतीने व्हाव्यात यासाठी काळजी घेण्यात आल्यानंतर देखील काल दिनांक १५ मार्च रोजी इयत्ता १० वी च्या मराठी विषयाच्या परीक्षेदरम्यान लक्ष्मीबाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, नीलजगाव, ता. पैठण जिल्हा औरंगाबाद येथे कॉपीचा गैरप्रकार समोर आला. येथे झालेल्या गैरप्रकाराबाबत प्राथमिक चौकशीअंती मुख्याध्यापक, सहशिक्षक/शिक्षकेतर कर्मचारी हे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवीत असल्याचे निदर्शनास आले असल्याची माहिती गायकवाड यांनी सभागृहात बोलताना दिली.

दरम्यान, सदर प्रकरणी शाळेची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे देखील शिक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे. इतकेच नाही तर त्यांनी इथे हे सांगू इच्छिते, की असा गैरप्रकार इतर शाळेत आढळल्यास त्यांच्यावरही अशी सक्त कारवाई केली जाईल, असे गायकवाड म्हणाल्या. तसेच पुढे त्यांनी, "विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत. बोर्डाच्या परीक्षा त्यांच्या भविष्यासाठी महत्वपूर्ण आहेत. या परीक्षा सुरक्षितपणे पार पडाव्या आणि विद्यार्थ्यांना निर्भीडपणे सामोरे जाता यावे, यासाठी पालक, शाळा, प्रसारमाध्यमे, लोकप्रतिनिधी आणि सर्व जनतेने शासनाला सर्वतोपरी सहकार्य करावे" असे अवाहन देखील गायकवाड यांनी केलं.

विशेष म्हणजे कॉपी होऊ नये म्हणून कॉपीविरोधी पथकाची सुद्धा नेमणूक करण्यात आली होती. मात्र असं असताना सुद्धा औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील लक्ष्मीबाई शाळेत कॉपी सुरुच असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर अशा शाळांची मान्यता काढून घेतली जाईल, सोबतच अशा शाळांना यापुढे परीक्षा केंद्रही दिले जाणार नाही असे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT