Vasant More esakal
महाराष्ट्र बातम्या

Vasant More: वसंत मोरेंचं काय होणार? तातडीनं मुंबईला बोलावलं

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते

रुपेश नामदास

Pune MNS: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील फायरब्रँड नेते आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती. वसंत मोरे नाराज असल्याच्या चर्चा अनेक वेळा समोर येतात. तर काही दिवसांपूर्वी मनसे माथाडी कामगार सेना जिल्हाध्यक्ष निलेश माझिरेंची हाकालपट्टी करण्यात आली. त्यानंतरही मोरे नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या.

हेही वाचा: Gujarat Election 2022: गुजरातच्या विजयाचे श्रेय शिंदे-फडणवीस सरकारला; राष्ट्रवादीची खोचक टीका

तर वसंत मोरे मनसे सोडणार की काय?, अशी चर्चा सुरू होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत येण्याची थेट ऑफर दिली आहे. अजितदादांच्या ऑफरनंतर आता राजकीय वर्तुळातील अनेक नेत्यांच्या भूवया उंचावल्याचे दिसून आले आहेत.

हेही वाचा- Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’

मात्र या घडामोडी घडत असताना आज थेट अमित ठाकरे यांनीच वसंत मोरे यांना तातडीने मुंबईला बोलावलं आहे. त्यामुळे याच्या बैठकीत काय चर्चा होणार याकडे मनसैनिकांचं लक्ष लागलं आहे. अमित ठाकरे मोरेंची नाराजी ठाकरे दुर करणार का कोणता दुसरा निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाच ठरलं आहे. मनसेच्या अनेक निर्णयावर वसंत मोरे नाराज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Kumbh Mela : २०२७ चा कुंभमेळा महाराष्ट्राचे 'ब्रँडिंग'! मुख्य सचिव राजेशकुमार यांचे सूक्ष्म नियोजन आणि विकासकामांना गती देण्याचे निर्देश

Daulat Sugar Factory : दौलत-अथर्व कामगार प्रश्नातून हलकर्णीत दोघांना बेदम मारहाण, 'स्वाभिमानी'च्या माजी तालुकाध्यक्षांची कार फोडली

Latest Marathi Breaking News Live: मातोश्री परिसरात ड्रोनमुळे खळबळ!

IND vs AUS, Video: T20I मालिका विजयानंतर कसं होतं भारताच्या ड्रेसिंग रुममधील वातावरण, 'या' खेळाडूने जिंकलं Impact Player मेडल

Phone Tips: फोन 100 % चार्ज करण्याची सवय ठरु शकते घातक, जाणून घ्या तोटे

SCROLL FOR NEXT