Uddhav Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गट आणि वंचितची युती तुटणार?

दत्ता लवांडे

छत्रपती संभाजीनगर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुल्ताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. हिंदु्त्वाचा विचार घेऊन पुढे चाललेल्या आणि औरंगजेबाच्या वृत्तीचा कायम विरोध करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला हे मान्य होईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्ष टिकवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. महाप्रबोधन यात्रा, वेगवेगळ्या मतदारसंघाच्या भेटी घेत पक्षवाढीसाठी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू असताना शिवसेनेच्या ठाकरे गटाने जानेवारी २०२३ मध्ये वंचित बहुजन आघाडीशी युती केली.

शिवशक्ती आणि भिमशक्ती एकत्र येण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतसुद्धा हा प्रयत्न झाला होता. शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांनी परत हा प्रयोग केला आहे. पण शिवसेना कायम हिंदुत्त्वाचा पुरस्कार करणारा पक्ष म्हणून पुढे आला. त्यांनी औरंगजेबाच्या वृत्तीचा कायम विरोध केला होता. पण युतीमध्ये असलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्यानंतर त्यांची साथ शिवसेना ठाकरे गट सोडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम पक्षाचे नेते आणि आमदार अकबरुद्दीन ओवैसींनी खासदार इम्तियाज जलील यांच्यासोबत औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी शिवसेनेकडून या कृत्याचा जबर विरोध करण्यात आला होता. "आता पहा काय होतंय ते, आम्ही सोडणार नाही, आम्ही हिंदुत्वासाठी लाठ्याकाठ्या खाल्ल्या आहेत आणि इथे असे प्रकार होत असतील तर याला आम्ही कडाडून विरोध करणार आहोत." अशा शब्दांत माजी खासदार खैरेंनी जलील यांच्यावर सडकून टीका केली होती.

मागच्या काही दिवसांत औरंगजेबाच्या फोटोवरून आणि त्याचे फोटो स्टेटसला ठेवण्यावरून महाराष्ट्रात हिंदू मुस्लीम समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे. यातच आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन घेतलंय. "औरंगजेब 50 वर्षे राज्य करून गेला ते तुम्ही कसं विसरणार? औरंगजेब ज्याच्यामुळे सत्ता करू शकला त्याला शिव्या घाला, औरंगजेबाला शिव्या घालून काय होणारे?" असं वक्तव्य आंबेडकरांनी यावेळी केलं.

मुस्लीम समाजातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी केलेला प्रयत्न यशस्वी ठरेल का? आणि प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाला हे मान्य होईल का? याकडे लक्ष लागलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT