Prakash Ambedkar&uddhav thackeray esakal
महाराष्ट्र बातम्या

Prakash Ambedkar: वंचित बहुजन आघाडीचा मविआत समावेश होणार?; आंबेडकरांचा ठाकरेंना अल्टिमेटम

राष्ट्रादीत फूट पडल्यानंतर आता राज्यातील राजकारणात वेगानं बदल व्हायला लागले आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रादीत फूट पडल्यानंतर आता राज्यातील राजकारणात वेगानं बदल व्हायला लागले आहेत. यापार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचा आता महाविकास आघाडीत समावेश होण्याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

पण मविआची स्थिती स्थिर नसल्यानं वंचितचे संघटक प्रकाश आंबेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम दिला आहे. तसेच जर वेळेत निर्णय झाला नाहीत आपण स्वतंत्रपणे लढण्यास मोकळे आहोत असा इशाराही त्यांनी दिला आहे. (VBA Will be included in MVA Prakash Ambedkar ultimatum to Uddhav Thackeray)

राज्यातील राजकारणाच्या बदललेल्या परिस्थितीनंतर वंचितचा महाविकास आघाडीतील समावेश होणार असल्याची चर्चा आहे. पण जर हे समिकरण जमलं नाही तर तेलंगाणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीसोबत वंचित बहुजन आघाडी जात तिसरी आघाडी होऊ शकते. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी मविआतील समावेशाबाबत पुढच्या १५ दिवसांत परिस्थिती स्पष्ट करावी असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

आंबेडकर म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत घेण्यासाठी शिवसेना पुढाकार घेत आहे पण जो प्रतिसाद राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडून मिळायला पाहिजे तो मिळत नाहीए. अदितदादांचा गट, नाना पटोले असे सार्वजनिकरित्या महाविकास आघाडीत असल्याचं सांगताना आम्ही स्वतंत्रपणे लढण्याची ताकद ठेवतो असं म्हणत होते.

पण आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांच्या पक्षाच्या काय भूमिका आहेत. त्यामुळं आता शिवसेनेला देखील खरोखर महाविकास आघाडीत लढायचं आहे की स्वतंत्रपणे लढायचं आहे. याचा अंतिम निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. मी अपेक्षा अशी ठेवतो की उद्धव ठाकरे याबाबत १० ते १५ दिवसांत याबाबत काय ती भूमिका आहे ती स्पष्ट करतील"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT