Sanjay Shirsat esakal
महाराष्ट्र बातम्या

Vedanta Foxconn Project : वेदांताच्या वादात आता शिरसाटांची उडी; करणार गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

Vedanta Foxconn Project : वेदांता प्रकल्प राज्यातून गुजरातमध्ये गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपप्रत्योरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. या प्रकल्पावरून विरोधकांचा चौफेर हल्ला होत असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटांनी वेदांता प्रकल्प कुणामुळे गेला आणि का गेला? याचा लवकरच खुलासा करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शिरसाट नेमका काय खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

या सर्व प्रकाराला आदित्य ठाकरे आणि सुभाष देसाई जबाबदार असून, हा प्रकल्प कुणामुळे गेला त्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचे शिरसाटांनी म्हटले आहे.

नेतेपद न दिल्याने शिरसाटांमध्ये नाराजी

दरम्यान, नुकतीच शिंदे गटाच्या नेते आणि उपनेतेपदाची याद जाहीर केली आहे. त्यात शिरसाटांचे नाव वगळ्यात आले आहे. त्यामुळे शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यात त्यांना उपनेतेपदावरून डावलण्यात आल्याने शिरसाटांचा पत्ता पक्षातून कट केला जातोय का? अशी चर्चा रंगली होती. मात्र, आपण नाराज नसल्याचे शिरसाटांनी स्पष्ट केले आहे. जर कुणी अशा अफवा पसरवत असेल तर मानहानीचा दावा ठोकणार असल्याचेही शिससाटांनी म्हटले आहे. शिंदेसोबत राहून काही मिळालं नाही तरीदेखील मी शिंदे गटातच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT