महाराष्ट्र बातम्या

राज्यात भाजीपाला निर्यात नोंदणीत विदर्भ अव्वल

राजेश रामपूरकर

नागपूर : निर्यातक्षम कृषी उत्पादनांच्या नोंदणीसाठी ऑनलाइन प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली आहे. त्यात विदर्भातील शेतकऱ्यांनी वरचष्मा राखला आहे. ‘अपेडा’तर्फे २००४-०५ पासून निर्यातक्षम कृषी उत्पादनांच्या नोंदणी केली जाते. राज्यात भाजीपाल्याचे ६ लाख ६८ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी यंदा कृषी विभागाने ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्राच्या ऑनलाइन नोंदणीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. गेल्यावर्षी २ हजार ६३९ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाल्याची ऑनलाइन नोंदणी झाली होती.

राज्यात सर्वाधिक ७३५ हेक्टर भेंडीच्या क्षेत्राच्या नोंदणी ऑनलाइन झाली आहे. त्यात बीड, भंडारा, गोंदिया, नागपूर, पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. त्याखालोखाल ३२९ हेक्टर क्षेत्र हिरव्या मिरचीचे नोंदले आहे. त्यात भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर, पालघर, सोलापूर, ठाणे, वर्धा जिल्ह्यातील शेतकरी आहेत. वांग्याच्या नोंदलेल्या १४७ हेक्टरचे शेतकरी भंडारा, नागपूर, वर्धा, गडचिरोली जिल्ह्यातील, तर ७६ हेक्टर कारल्याचे उत्पादक भंडारा, गडचिरोली जिल्ह्यातील, ३३ हेक्टरवरील सिमला मिरचीचे शेतकरी बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, ठाणे व वर्धा जिल्ह्यातील आहेत.

युरोपियन देशांनी कीडनाशकाचे उर्वरित अंशमुक्तीची हमी अशी अट लागू केली आहे. त्यादृष्टीने जागतिक आणि देशांतर्गत ग्राहकांना निर्यातक्षम दर्जाचा भाजीपाला मिळावा यादृष्टीने कृषी विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. देशात भाजीपाल्याच्या नोंदणीसाठी ‘अपेडा‘वरील संकेतस्थळावर असलेल्या सुविधेमध्ये ४३ प्रकारच्या भाजीपाल्याची व्यवस्था आहे. त्यात राज्यातील २६ प्रकारच्या भाजीपाल्याची नोंद शेतकऱ्यांनी आतापर्यंत केली आहे.

लिंबूवर्गीय फळांचे १ हजार १४३ हेक्टर क्षेत्र

संत्री, मोसंबी, लिंबू या लिंबूवर्गीय फळांचे राज्यात १ लाख ४४ हजार १८० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी साडेचार हजार हेक्टर क्षेत्राची ऑनलाइन नोंदणीचे उद्दिष्ट कृषी विभागाचे आहे. गेल्यावर्षी १ हजार ८४३ हेक्टर क्षेत्राची नोंदणी झाली होती. आतापर्यंत १ हजार १४३ हेक्टरची ऑनलाइन नोंदणी शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला, अमरावती, भंडारा, नागपूर, वर्धा आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा यात समावेश आहे.

‘अपेडा’ संकेतस्थळावरील नोंदणीची स्थिती

(आकडे नोंद झालेले आकडे हेक्टरमध्ये दर्शवितात)

  • बटाटा (१)- भंडारा

  • दोडका (१)- नागपूर

  • गोल खवळी (४)- भंडारा, वर्धा

  • टोमॅटो (९१)- भंडारा, बुलडाणा, गडचिरोली, नागपूर, ठाणे, वर्धा

  • तोंडली (१)- वर्धा

  • चवळी (१२)- भंडारा, ठाणे, वर्धा

  • हळद (३)- नागपूर, वर्धा

  • राजगिरा (२)- भंडारा

  • पालक (१)- नागपूर

  • दुधी भोपळा (२)- भंडारा, ठाणे

  • गवार (९)- नागपूर, वर्धा, ठाणे

  • कोथिंबीर (८)- नागपूर, भंडारा

  • चवळी (१९)- भंडारा, नागपूर, वर्धा, ठाणे

  • हिरवे फणस (१)-गडचिरोली

  • कच्ची पपई (१)- नागपूर

  • काकडी (१२)- नागपूर, भंडारा, रायगड, ठाणे, वर्धा

  • शेवगा (५)- नागपूर, वर्धा

  • मेथी (१४)- भंडारा, नागपूर, वर्धा

  • घेवडा (५)- भंडारा, नागपूर, वर्धा

  • आले (४)- सोलापूर, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2025: भारतीय संघ सेमीफायनलमध्ये! न्यूझीलंडचे पराभवासह आव्हान संपलं; स्मृती मानधना-प्रतिका रावल विजयाच्या नायिका

Raireśhwar Fort Incident VIDEO : रायरेश्वर किल्ला परिसरात दारू पार्टी करणाऱ्या परप्रांतीय तरूणांना शिवप्रेमींकडून चोप!

Ambulance Fire : मध्यरात्री लातूरकडे जाताना ॲम्बुलन्स जळून खाक! डॉक्टरांनी दाखवले प्रसंगावधान, महिलेचा जीव वाचला

Lonar News : समृद्धी महामार्गावर मोठी कारवाई! संशयास्पद कंटेनर चालकाजवळ आढळले देशी पिस्तूल व जिवंत काडतुसे

PM Kisan Yojana News: पीएम किसान योजनेच्या २१ व्या हप्त्याबाबत नवीन अपडेट; जाणून घ्या, २००० रुपये कधी येणार?

SCROLL FOR NEXT