भाजीपाला महाग sakal media
महाराष्ट्र बातम्या

भाजीपाला तेजीत, लसणाची फोडणी महागली! लसूण 340 रुपये किलो, टोमॅटो, गवारी, वांगी, दोडक्यांचेही दर वाढले, जाणून घ्या भाजीपाल्यांचे दर

पावसाळा संपल्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर वाढू लागले आहेत. रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवड, यामुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवारी, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पावसाळा संपल्यानंतर आता भाजीपाल्यांचे दर वाढू लागले आहेत. रब्बी पेरणीची तयारी व कांदा लागवड, यामुळे कमी क्षेत्रावर भाजीपाल्याची लागवड आहे. कोथिंबीर, टोमॅटो, गवारी, लसूण, दोडका, कारले, हिरवी मिरची, वांगी, भेंडी अशा भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

कोणतीही भाजी करायची झाली की, जिरे- मोहरी आणि लसूण आवश्यक असतो. परंतु, मागील महिनाभरात लसणाची आवक कमी झाल्याचा थेट परिणाम दरावर झाला आहे. दीड महिन्यापूर्वी अवघ्या १०० ते १३० रुपये किलो दरात मिळणारा लसूण सध्या ३५० रुपये किलोवर पोचला आहे. काही दिवसांत लसणाचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या बाजारात लसणाचे भाव ३४० रुपये किलोपर्यंत आहे.

खराब हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये लसूण पिकांचे नुकसान झाले आहे. लसणाच्या भावात वाढ होण्यामागे हेच प्रमुख कारण सांगितले जात आहे. मुसळधार पावसामुळे लसूण लागवड विलंबाने झाली असून तो लसूण बाजारात यायला आणखी काही दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे आणखी काही दिवस लसणाची फोडणी महागच असणार आहे.

असे आहेत भाजीपाल्याचे दर

  • लसूण : २१० ते ३४० रुपये

  • गवारी : ३५ ते ८० रुपये

  • वांगी : २५ ते ६० रुपये

  • दोडका : २५ ते ६० रुपये

  • टोमॅटो : २५ ते ५५ रुपये

  • भेंडी : २५ ते ४० रुपये

  • कारले : २० ते ३५ रुपये

  • हिरवी मिरची : २० ते ४५ रुपये

कांद्याला २५ ते ३० रुपयांचाच दर

कांद्याला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल दर अपेक्षित असतानाही शेतकऱ्यांना सध्या २५ ते ३० रुपये किलो दराने नवीन कांदा विकावा लागत आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज सरासरी अडीचशे गाड्या कांदा आवक आहे. त्यात पावसाने भिजून खराब झालेला कांदाही लक्षणीय आहे. त्यासाठी १० रुपये ते १५ रुपये किलोचा दर मिळत आहे. अन्य भाजीपाल्यांचे दर वाढत असतानाच कांद्याचे दर मात्र वाढले नसून सध्या ते स्थिर आहेत.

लसणाची आवक घटल्याने भावात वाढ

भारतात सुमारे ३२ ते ३५ लाख टन लसणाचे उत्पादन होते. भारतात लसणाचे सर्वाधिक उत्पादन मध्य प्रदेशात होते. चीनमध्ये दरवर्षी सुमारे २ ते २५ दशलक्ष टन लसणाचे उत्पादन केले जाते, तरी दोन्ही देशांमध्ये बहुतेक लसणाचा वापर देशांतर्गत केला जातो. सोलापूरात येणारा लसूण हा मध्यप्रदेश व कर्नाटकचा असतो. यंदा पर्जन्य अधिक झाल्याने आवक कमी आहे.

- शिवशंकर बिराजदार, लसूण व्यापारी, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Airport: विमानतळांच्या खासगीकरणात सरकारचा नवा नियम! एका कंपनीला मर्यादित एअरपोर्टच मिळणार; बिडिंग कॅप लागू होणार

DJ Sound : तीव्र आवाजाच्या डीजेला बंदीच! पुणे पोलिसांची स्पष्ट भूमिका; नियमांचे उल्लंघन केल्यास थेट जप्ती

Mohol News : 'प्रेस' लिहिलेल्या वाहनावर मोहोळ पोलीस करणार कारवाई, डिजिटल फलकावर आता लिहावा लागणार कालावधी मोहोळ पोलिसांचा निर्णय

Video: Ruturaj Gaikwad ची १० वर्षांची तपश्चर्या भंगली! धाव घेताना गोंधळ उडाला अन् जे कधीही घडलं नव्हतं, ते घडलं

Tamil Nadu TET Exemption : शिक्षकांना मोठा दिलासा! TET मधून सुटका होणार? विजय सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT