cash sakal
महाराष्ट्र बातम्या

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी आढळल्यास त्याच्या पालकास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वाहनाचा विमा नसल्यास दोन हजार रुपयांचा स्वतंत्र दंड आकारला जातो. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी मागील महिनाभरात चार दुचाकींच्या मूळ मालकांवर अशा प्रकारची कारवाई केली आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : अल्पवयीन मुलाच्या हाती दुचाकी आढळल्यास त्याच्या पालकास दहा हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. वाहनाचा विमा नसल्यास दोन हजार रुपयांचा स्वतंत्र दंड आकारला जातो. सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी मागील महिनाभरात चार दुचाकींच्या मूळ मालकांवर अशा प्रकारची कारवाई केली आहे. दंड जागेवरच भरून वाहन त्यांच्या ताब्यात दिले जाते, पालकास समज देऊन सोडण्यात येते आणि पुढील कारवाईसाठी खटला न्यायालयात पाठविला जातो, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.

अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन दिल्यास मूळ मालकास एकूण दहा हजार रुपयांचा दंड होतो. तरीही शहरातील शेकडो पालक आपल्या अल्पवयीन मुलांना दुचाकी व चारचाकी वाहने बिनधास्तपणे देत आहेत. ही मुले शाळा, महाविद्यालये तसेच कोचिंग क्लासेससाठी ये-जा करतात. रस्त्यांवरील वाढती वाहतूक आणि गोंधळामुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन अपघात घडतात. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई तीव्र केली असून संबंधित मुलांच्या पालकांना बोलावून थेट दंड वसूल केला जात आहे. शहरातील सिग्नलवर तैनात पोलिसांनाही अशा वाहनांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

१४ मार्च रोजी लोकअदालत

मागील वर्षभरात सोलापूर शहर वाहतूक पोलिसांनी शहरातून ये-जा करणाऱ्या दोन लाख ३९ हजार बेशिस्त वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. या वाहनचालकांवर तब्बल २२ कोटी ८१ लाख रुपयांचा दंड प्रलंबित आहे. १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालत होणार असून, त्यापूर्वी दंड न भरलेल्या वाहनचालकांना समन्स व वॉरंट बजावले जाणार आहेत. सुमारे दहा हजारांहून अधिक वाहनचालकांना नोटिसा देण्याची तयारी सुरू आहे.

बेशिस्तांवर आता सिग्नलच्या ठिकाणी देखील कारवाई

सोलापूर शहरातील रस्त्यांवर एकही अपघात होऊ नये, यासाठी सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. अनेक पालक अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देतात, त्यातून गंभीर अपघात होऊन जीवितहानीही झाली आहे. बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघात आणि वाहतूक कोंडी वाढते. त्यामुळे शहरात दररोज सकाळ-संध्याकाळ चार ठिकाणी नाकाबंदी केली जाते. तसेच ठिकठिकाणी वाहतूक अंमलदार कारवाई करत असून नागरिकांमध्ये स्वयंशिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT