Solapur traffic police sakal
महाराष्ट्र बातम्या

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

सोलापूरसह राज्यभरात १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील १८७८ वाहनधारकांना समन्स तर १४६२ वाहन चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे चार हजार वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : सोलापूरसह राज्यभरात १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील १ हजार ८७८ वाहनधारकांना समन्स तर १ हजार ४६२ वाहन चालकांना वॉरंट काढण्यात आले आहे. याशिवाय ग्रामीण भागातील सुमारे चार हजार वाहनधारकांना देखील तशा नोटिसा गेल्या आहेत. त्या सर्वांना दंड भरावाच लागेल, अन्यथा त्यांच्याविरुद्ध कोर्टात खटला दाखल केला जाणार आहे.

ट्रिपल सीट दुचाकीस्वार, क्षमतेपेक्षा माल व प्रवासी वाहतूक, रस्त्याच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविणे, मोबाईल टॉकिंग, लायसन्स नसताना वाहन चालविणे, नंबरप्लेट नसलेली वाहने, अशा बेशिस्त वाहनधारकांना दंड केला जातो. ज्या वाहनधारकांना दंड झाला आहे, त्यांना तो भरावाच लागतो. वाहतूक पोलिसांकडे दंडाच्या मशीन्स देण्यात आल्या असून त्यांना स्वतःच्या खासगी मोबाइलमध्ये नव्हे तर त्या मशीनमध्येच फोटो काढून बेशिस्त वाहनधारकांना दंड करण्याचा अधिकार आहे. सोलापूर शहरात दरवर्षी २५ हजारांहून अधिक वाहनधारक वाहतूक नियम मोडतात. ग्रामीणमधील ही संख्या दुप्पट आहे. दरवर्षी शहर-जिल्ह्यातील बेशिस्त वाहनधारकांना तब्बल १२ ते १५ कोटींचा दंड होतोय, तरीदेखील वाहतूक नियम पायदळी तुडविणाऱ्या वाहन चालकांची संख्या कमी झालेली नाही.

बेशिस्त वाहनधारकांना दंड भरावाच लागेल

ज्या वाहनधारकांना वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी दंड झालेला आहे, त्यांनी जेलरोड पोलिस ठाण्याजवळील वाहतूक पोलिस शाखेत जाऊन किंवा वाहतूक अंमलदारांमार्फत दंड भरावा. ज्यांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले आहे त्यांना लोकअदालतीच्या माध्यमातून दंड भरता येईल. वाहनांवरील दंड प्रत्येकाला भरावाच लागेल.

- सुधीर खिरडकर, सहायक पोलिस आयुक्त, सोलापूर शहर

‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

सोलापूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातून सुमारे ३५० सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. धर्मवीर संभाजीराजे चौक (जुना पूना नाका), छत्रपती शिवाजी महाराज चौक, चार हुतात्मा पुतळ्याजवळ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हरिभाई देवकरण प्रशालेजवळ याशिवाय इतर महत्त्वाच्या चौकांमध्ये ते कॅमेरे आहेत. त्याचा नियंत्रण कक्ष महापालिकेत असून त्याठिकाणी दोन वाहतूक अंमलदार नेमलेले आहेत. तेथून शहरातील रस्त्यांवर वाहतूक नियम मोडून वाहन चालविणाऱ्यांवर ऑनलाइन दंड केला जातो.

सोलापुरात हेल्मेट नसलेल्यांवरही दंड

सोलापूर शहरात हेल्मेट सक्ती आहे की नाही, महामार्गांवरून प्रवास करणाऱ्यांसाठीच तो नियम आहे का, असे अनेक प्रश्न आहेत. काहीजण सांगतात, शहरात हेल्मेट सक्ती नाही. तरीपण, सोलापूर शहरातून दररोज लाखो दुचाकीस्वार विनाहेल्मेट ये-जा करतात. तरीपण, त्यातील काहींनाच हेल्मेटविना दुचाकी चालविली म्हणून दंड केला जातो, अशीही उदाहरणे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

France protests: नेपाळ पाठोपाठ आता फ्रान्सही पेटलं! रस्त्यावर सुरू झाली जोरदार निदर्शनं अन् जाळपोळ

Uttar Pradesh : नेपाळमधील अराजकतेच्या पार्श्वभूमीवर CM योगी ऍक्शन मोडवर;पोलिसांना दिले आदेश

Yogi Adityanath: ''गरिबांच्या जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांना सोडणार नाही'' जनता दरबारात मुख्यमंत्री आदित्यनाथ कडाडले

Horoscope 2025 : पितृपक्ष ठरणार 'या' 3 राशींना LUCKY ! भद्र महापुरुष योगामुळे होणार पैशांची बरसात

Yogi Adityanath: योगी आदित्यनाथ यांच्याकडून पुरग्रस्तांना मोठा दिलासा; ४८ मदतवाहनांना दिला हिरवा झेंडा, १० कोटींची मदत जाहीर

SCROLL FOR NEXT