Venkat Khatke from Takli village has become a state tax inspector 2.jpg
Venkat Khatke from Takli village has become a state tax inspector 2.jpg 
महाराष्ट्र

Success Story : कोरडवाहू शेतात राबणाऱ्या वडिलांच्या प्रोत्साहानाने व्यंकट झाला अधिकारी

सुस्मिता वडतिले

पुणे : घरची परिस्थिती तशी जेमतेमच. तरीही कष्ट करून स्वतःची एक खास ओळख बनवायची ही जिद्द मनाशी बाळगून त्याने वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवलेच. दगडासारख्या कठीण परिस्थितीवर घाव घालण्याची जिद्द असली की मूर्तीसारखी सुंदरता आयुष्याला लाभते. त्यातीलच एक उदाहरण म्हणजे व्यंकट हरीराम खटके. सुरवातीला व्यंकट त्याच्या शेतातील कामाबरोबरच शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीवर मात करत आज तो राज्यकर निरीक्षक झाला असून अहमदनगर येथील वस्तू व सेवा कर भवन येथे कार्यरत आहे. आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही. ते व्यंकटने सिद्ध करून दाखवलं आहे. 

व्यंकट हा मूळचा उस्मानाबाद येथील टाकळी गावातील आहे. त्याचे शालेय शिक्षण गावातच पूर्ण केले असून राहुरी येथून बी फार्मसीचे शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने शिक्षण घेतच २०१६ पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली. स्पर्धा परिक्षेतूनच पुढे करियर करायचे त्याने ठरवले. त्यावेळी त्याला घरच्यांची साथ ही मिळाली. आणि एका वर्षात त्याला कष्टाचं फळं ही मिळालं. २०१७ ला परभणी जिल्हा रुग्णालय येथे औषध निर्माण अधिकारी या पदावर कार्यरत झाले. ते काम करतच त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास काही सोडला नाही. 

आपल्या कर्तृत्वातून त्याने त्याच्या नावाची वेगळी ओळख बनवली आहे. अभ्यासात सातत्य ठेवून त्याने पुढील परीक्षा देतच राहीला आणि २०१९ ला महाराष्ट्रातून 38 रँकवर राज्यकर निरीक्षक या पदावर गवसणी घेतली आहे. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना काही थोड्या फार अडचणी आल्या पण आई वडिलांची साथ मिळ्यामुळे त्याला काहीच कमी पडले नाही. सध्या सरकारी नोकरी लागून त्याला तीन वर्ष पूर्ण झाले आहे.

व्यंकट यांची पाच एकर कोरडवाहू शेती असून त्याचे आई वडील आणि लहान भाऊ शेती करत आहेत. तो घरातील मोठा मुलगा आहे. त्याच्या घरात आई वडील त्याचा लहान भाऊ आणि तो राहतो. त्यांच्या तिन्ही बहिणीचा विवाह झाला आहे. घरामध्ये शिक्षणाची पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. यशाचा मार्ग खडतर असला तरीही लहानपणापासून मनात निश्चय केल्यास आपण काहीही करू शकतो. ते व्यंकटने मनात ठरवून अजूनही पुढे जाण्यासाठी धडपडत आहे. यश संपादन केल्यानंतर व्यंकटच्या कुटुंबाचे आनंद गगनात मावत नव्हते. ते इतक्यावरच न थांबता आजही तो अभ्यास सुरूच ठेवला आहे. व्यंकटचे पुढे जाऊन जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तो आणखीन प्रयत्न करत आहे. 

व्यंकट खटके म्हणाले, परिश्रमावर मात करत येणाऱ्या नव्या पिढीने चांगला अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळेल. परिस्थिती कधीही तशीच राहत नाही. त्या परिस्थितीला बदलायचे असेल तर ते आपल्याही हातात आहे. शिक्षण घेऊन आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा. कष्ट केले तर यश नक्कीच मिळते. मोठी स्वप्न पाहत राहा. मेहनत घ्यायची ईच्छा असेल तर परिस्थिती कशी का असेना यश आपल्या समोर पांघरून नक्कीच घालतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT