Dapoli NCP Melava Sunil Tatkare Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP MLA Disqualification: राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रेवर ३१ जानेवारीपूर्वी येणार निकाल; गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात

निवडणूक आयोगातील पक्ष आणि चिन्हाबाबतही लवकरच निकाल येऊ शकतो

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करुन बाहेर पडलेल्या अजित पवार गटाच्या नेत्यांविरोधात अपात्रतेची कारवाईसाठी विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार, ३१ जानेवारीपूर्वी यावर निकाल द्यावा लागणार आहे.

त्यानुसार, येत्या गुरुवारपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाचा पक्ष आणि चिन्हाबाबतचा निकालही कुठल्याही क्षणी येऊ शकतो. (Verdict on NCP MLA disqualification before January 31 hearing starts from Thursday)

माध्यमांतील वृत्तानुसार, राष्ट्रवादीच्या आमदार अपात्रताप्रकरणी गुरुवारी सुनावणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर ही सुनावणी पार पडणार आहे. सुप्रीम कोर्टानं यासंदर्भात राहुल नार्वेकर यांना याबाबत सूचना दिल्या आहेत.

दरम्यान, सध्या राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष याबाबत निवडणूक आयोगाकडं सुनावणी सुरु आहे. याचा निकालही कोणत्याही क्षणी येऊ शकतो. तर दुसरीकडं विधानसभा अध्यक्षांसमोरही सुनावणी सुरु होत आहे. याचाही निकाल ३१ जानेवारीपूर्वी विधानसभा अध्यक्षांना निकाल द्यावा लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT