shrikant-moghe 
महाराष्ट्र बातम्या

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं निधन

सकाळ डिजिटल टीम

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळानं निधन झालं, ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळं रंगभूमी, टीव्ही आणि सिनेक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. मोघे यांनी ५० हून अधिक नाटकं आणि सिनेमांत कामं केली आहेत. सन २०१२ मध्ये सांगली येथे झालेल्या ९२व्या मराठी नाट्यसंमेलनाचे त्यांनी अध्यक्षपदही भूषवले होते.

श्रीकांत मोघे यांचा ६ नोव्हेंबर १९२९ रोजी किर्लोस्करवाडी येथे जन्म झाला होता. त्यांचं दहावीपर्यंत शिक्षण किर्लोस्करवाडीतच झालं. त्यानंतर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. तर पुढील शिक्षण त्यांनी पुण्यातील स. प . महाविद्यालयातून घेतलं. त्यानंतर मुंबईतून त्यांनी आर्किटेक्चरही पदवीही मिळवली. शालेय जीवनापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती, त्यामुळे उच्च शिक्षण घेतल्यानंतरही ते आपल्या या आवडीच्या क्षेत्रातच रमले. 

'तुझं आहे तुझंपाशी', 'लेकुरे उदंड झाली', 'वाऱ्यावरची वरात', 'अश्रूंची झाली फुले' आदी नाटकं तसेच 'मधुचंद्र', 'सिंहासन', 'गंम्मत-जंम्मत', 'उंबरठा', 'वासुदेव बळवंत फडके' हे चित्रपट गाजले. 

श्रीकांत मोघे यांना मिळालेले पुरस्कार

महाराष्ट्र राज्य सांस्कृतीक पुरस्कार 
काशीनाथ घाणेकर पुरस्कार
केशवराव दाते पुरस्कार
अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेचा पुरस्कार
गदिमा पुरस्कार
प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार
महाराष्ट्र शासनाचा कलागौरव पुरस्कार
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : कॉर्पोरेटमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून बनला रिक्षा ड्रायव्हर; म्हणाला- पैसा गरजेचा पण... तरुणाचा व्हिडिओ तूफान व्हायरल

'Virat Kohli ला काही सिद्ध करण्याची गरज नाही...' कार्तिकने मनातलं सर्व बोलून दाखवलं; २०२७ वर्ल्ड कपबद्दल काय म्हणाला? पाहा Video

काय सांगता! 'या' मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर? साऊथही गाजवलंय, लपूनछपून सुरू आहे सारं

Dry Day: तळीरामांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यभरात ३ दिवस ड्राय डे; कोणकोणत्या शहरात मद्यविक्री बंद? जाणून घ्या यादी...

कर्नाटकात मुख्यमंत्री बदलाबाबतचा निर्णय सोनिया गांधी घेणार; दिल्लीत घडामोडींना वेग, DK शिवकुमारांच्या गळ्यात CM पदाची माळ?

SCROLL FOR NEXT