Bhalchandra Nedmade esakal
महाराष्ट्र बातम्या

Aurangzeb:जेष्ठ साहित्यिक नेमाडेंचे खळबळजनक विधान,'औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताच'

जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी ज्ञानवापी मशीदीबद्दल देखील वक्तव्य केलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

Bhalchandra Nemade: जेष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी औरंगजेबाबद्दल खळबळजनक विधान केलंय. औरंगजेबाबद्दल चुकीचं सांगितलं जातंय, तो तसा नव्हताचं, असे वक्तव्य भालचंद्र नेमाडे यांनी केलं. यावेळी भालचंद्र नेमाडे म्हणाले की सर्वात आधी सती प्रथा बंद करणारा लॉर्ड बेंटिक नव्हता, तर औरंगजेबाने सतीची प्रथा बंद केली.

एका कार्यक्रमात बोलताना भालचंद्र नेमाडे म्हणाले की, "औरंगजेबाविषयी चुकीचं सांगितलं जातंय. औरंगजेब तसा नव्हताचं.सतीची चाल बंद करणारा कोण होता? इतिहासात फक्त बेंटिकचं नाव सापडतं,पण सर्वात आधी औरंगजेबानं सतीप्रथा बंद केली. "

यापुढे त्यांनी ज्ञानवापी मशिदीच्या तोडफोडीबद्दलही महत्वाचे वक्तव्य केले. काशी-विश्वेश्वर येथील पंडीतांकडून तरुण बायका भ्रष्ट केल्या जात होत्या, असा आरोपही त्यांनी केला. नेमाडे म्हणाले की,"औरंगजेबाच्या दोन राण्या काशी विश्वेश्वराला गेल्या. आल्याच नाही परत. छावणीतील लोक म्हणाले, गेल्या होत्या आल्या नाय परत. त्यानंतर ते चौकशी करायला गेले. तेव्हा तेथील जे पंडेल होते, ते तरुण बायकांना भूयारी मार्गतून नेऊन भ्रष्ठ करायचे.

हे जेव्हा त्याच्या लक्षात आलं, तेव्हा ती ज्ञानवापीची मोडतोड झाली. तेव्हा त्याला असं वाटल की, असे जर हे पंडे असतील तर यांना साफ केलं पाहिजे. तेव्हा इतिहासकारांनी अशी नोंद घेतली,की हा हिंदूद्वेष्टा होता. "(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT