Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

मनसेच्या 'हनुमान चालिसा' मोहिमेबद्दल विश्व हिंदू परिषदेनं स्पष्टच सांगितलं!

विश्व हिंदू परिषद ही अराजकीय संघटना आहे, ती कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ३ मे रोजी मशिदींवरील भोंगे हटवले नाहीत, तर हनुमान चालिसा लावू असा इशारा दिला होता. या मनसेच्या कार्यक्रमात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्तेही सहभागी होणार अशा बातम्या येत होत्या. मात्र या केवळ अफवा असल्याचं विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केलं आहे.

मनसेचं हे प्रोपगंडाचं राजकारण असल्याची टीका विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तसंच विश्व हिंदू परिषद अशा कोणत्याही राजकीय कार्यक्रमाला किंवा राजकीय पक्षाला कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देणार नाही, त्यांच्या कार्यक्रमात सहभागी होणार नाही, असं स्पष्ट केलं.

विश्व हिंदू परिषद असो किंवा बजरंग दल कोणीही मनसेच्या हनुमान चालिसा कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला नाही. याबद्दल येणाऱ्या बातम्या बोगस आणि निराधार आहेत, अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय प्रवक्ते विनोद बन्सल यांनी दिली. विश्व हिंदू परिषद ही अराजकीय संघटना आहे, ती कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा देत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

Junnar News : जुन्नर शहरात श्री तुळजाभवानी माता पलंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

SCROLL FOR NEXT