Devendra fadanvis  sakal
महाराष्ट्र बातम्या

फडणवीसांची रणनीती यशस्वी; भाजपचे पाचही उमेदवार विजयी

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : दोन तासांच्या विलंबानंतर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर आता पहिल्या फेरीचा निकाल हाती आला आहे. यामध्ये भाजपचे सर्वच्या सर्व 5 उमेदवार विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) 2 शिवसेनेचे (Shivsena) 2 आणि काँग्रेसचा एक उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपच्या या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांची रणनीती राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील यशस्वी ठरली आहे. (MLC Election 2022 News In Marathi)

दरम्यान, पहिल्या फेरीच्या हाती आलेल्या निकालानुसार भाजपचे उमेदवार प्रविण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे, प्रसाद लाड हे विजयी झाले आहेत. तर शिवसेनेचे उमेदवार सचिन अहिर आणि आमश्या पाडवी हे विजयी झाले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसेही विजयी झाले आहेत. तसेच काँग्रसेचे भाई जगताप विजयी झाले आहे. मात्र, पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा या निवडुकीत पराभव झाला आहे.

भाजपकडून संभ्रम निर्माण करायला सुरुवात; आक्षेपानंतर मिटकरींचे ट्वीट

मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील एक मत बाद ठरवण्यात आले होते. तर, त्यानंतर मविआने भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतला होता. भाजपकडून रामराजे यांच्या निंबाळकरांच्या कोट्यातील एका मतावर आक्षेप घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्वीट केले होते. यामध्ये त्यांनी भाजपकडून खोट्या बातम्या पेरायला सुरुवात. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कोट्यातील मत बाद झाल्याची बातमी खोटी. भाजपकडून संभ्रम निर्माण करायला सुरुवात असे म्हणत भाजपवर हल्लाबोल केला होता.

मुक्ता टिळक अन् लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर काँग्रेसचा आक्षेप

सकाळी मतदानावेळी काँग्रेसकडून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या मतदानावर आक्षेप घेण्यात आला होता. मुक्ता टिळक जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. तसेच मतदानावेऴी दोन सहकारी उपस्थित असल्याचाही आरोप करत काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही तक्रार करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT