Maharashtra political news latest 
महाराष्ट्र बातम्या

सदाभाऊ म्हणाले, फडणवीसांचा आदेश आला अन् मी उमेदवारी अर्ज मागे घेतला

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता

सकाळ डिजिटल टीम

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता.

राज्यसभा निवडणुकीनंतर आता राज्यात विधान परिषदेसाठी रणधुमाळी सुरु झाली आहे. या निवडणुकीसाठी भाजपसह महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक नाट्यमय राजकीय घडामोडींनंतर २० जून रोजी ही निवडणुक पार पडणार आहे. राज्यसभेप्रमाणे या निवडणुकीत भाजपचं विजयी होईल असा विश्वास अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, आता विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याकरता काही मिनिटांचा वेळ शिल्लक असताना सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघारी घेतला आहे. (Maharashtra political news latest)

सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता. मात्र आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानुसार आपण अर्ज मागे घेत असल्याचा खुलासा खोत यांनी केला आहे. याशिवाय उमेदवारी मागे घेण्याचं नेमकं कारणही खोतांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, मतांची गोळाबेरीज करणं कठीण गेलं असतं, म्हणून विधानपरिषद निवडणूकीतून माघार घेतली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

पुढे ते म्हणाले, देवेंद्र फडणवीसांच्या साथीने मागे घेतलेली दोन पावलं नक्कीच चार पावलं पुढं टाकण्यासाठी असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या माघारीनंतर आता भाजपचे ५ अधिकृत उमेदवार विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. म्हणजेच आता विधान परिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवारांत थेट लढत होणार आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी भाजपच्या पाठिंब्यावर ९ जून रोजी अर्ज दाखल केला होता. फडणवीसांच्या सांगण्यानुसार अर्ज भरला, त्यांनी सांगितलं तर पुन्हा माघारही घेऊ, असंही सदाभाऊ खोत यांनी म्हटलं होतं. सध्या भाजपकडे सध्या १०६ इतकं संख्याबळ असून काही अपक्ष आमदार त्यांच्यासोबत आहेत. विधानपरिषदेत प्रत्येक आमदाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची २७ मते आवश्यक आहेत. या गणितानुसार, भाजपचे पहिले ४ उमेदवार सहज निवडून येतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke MPSC : धर्म-जातीच्या नावावर मत मागता, पण शिक्षणाचं काय?’; पुण्यातील एमपीएससी आंदोलनात अभिजीत दिपकेंचा सवाल

GST Council : GSTचे नियम बदलणार? 9 गुन्हे वगळण्याचा प्रस्ताव, अटक प्रक्रियेतही मोठी सुधारणा होण्याची शक्यता

IND vs WI, Schedule: वनडे मालिका संपली, आता ५ सामन्यांची T20I मालिका होणार सुरू; संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : देश-विदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

किटलीशिवाय कप-बशी भरणार नाही; शिट्टीपासून सावध राहा; सोमेश्वर निवडणुकीत युगेंद्र पवारांचे सूचक आवाहन

SCROLL FOR NEXT