Fadnavis-Thackrey Meet Esakal
महाराष्ट्र बातम्या

Fadnavis-Thackrey Meet: भाजप-ठाकरेमध्ये जवळीक वाढली? आधी चंद्रकांत पाटील नंतर उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस भेटीनं चर्चांना उधाण

Fadnavis Thackrey Meet: अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. लिफ्टमधून जात असताना फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली आहे. या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली. या दरम्यान राज्यातील सत्ताधारी आणि विरोधक अधिवेशनाला हजर राहिले आहेत. या अधिवेशनादरम्यान भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची भेट झाली. लिफ्टमधून जात असताना फडणवीस आणि ठाकरे यांची भेट झाली यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली आहे. या भेटीची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान सकाळी चंद्रकांत पाटील यांनी देखील सकाळी उध्दव ठाकरे यांची भेट घेतली आहे. या आजच्या भेटींमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजप आणि ठाकरे यांच्यात जवळीक वाढली आहे का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या भेटीवर प्रतिक्रिया देताना भाजपचे अतुल भातखळकर म्हणाले, उद्धव ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची आवश्यकता नाही. ही भेट योगायोगानं झाली आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

राजकारणात कट्टर विरोधक असलेले उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज एकमेकांसमोर आले. दोघेही उद्धव ठाकरे-फडणवीस एकाच लिफ्टमधून सभागृहात गेले. त्यावेळी उद्धव ठाकरे- फडणवीस लिफ्टजवळ एकमेकांशी बोलले. त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली याची माहिती अद्याप कळू शकलेली नाही. मात्र त्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्क- वितर्कांना उधाण आले आहे.

चंद्रकांत पाटलांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट! 

भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि अंबादास दानवे यांची भेट घेतली आहे. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना चॉकलेट दिलं. त्याचबरोबर अनिल परब यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या.

चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात उध्दव ठाकरे आणि दानवेंची भेट घेतली. यावेळी या नेत्यांमध्ये चर्चा देखील झाली. त्यावेळी अनिल परब देखील उपस्थित होते. हि भेट कोणत्या कारणासाठी घेतली याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. यावेळी चंद्रकांत पाटलांनी पेढा देखील भवरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT