Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Esakal
महाराष्ट्र बातम्या

Vidhan Sabha Election: महायुतीत कोणाला किती जागा? भाजपच्या बड्या नेत्याने सांगितला जागा वाटपाचा फॉर्म्युला

Chandrakant Patil: लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. जागा वाटपावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या प्राथमिक चर्चा होताना दिसत आहे.

सकाळ वृत्तसेवा

लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्याला विधानसभेचे वेध लागले आहेत. जागा वाटपावर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या प्राथमिक चर्चा होताना दिसत आहे. याचबरोबर त्यांनी महायुतीच्या विधानसभेसाठीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युलाही सांगितला आहे.

संतांच्या पालख्या आज पुण्यनगरीत होत्या. संतांच्या दर्शनासाठी आलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना आषाढी एकादशीची पुढची पूजा करणार, अशी गुगली टाकून त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चंद्रकांतदादांनी त्यावर उत्तर देताना मोठा दावा केला आहे.

आगामी आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पांडुरंगाची महापुजा करतील, असे सांगून चंद्रकांत पाटील यांनी पत्रकाराच्या गुगलीवर षटकार ठोकत आपल्यातील कसलेल्या राजकारण्याचे दर्शन घडविले. पुण्यात माध्यमांशी बोलताना सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादांनी सेफ उत्तर देत कोणत्याही वादात न अडकण्याचा प्रयत्न केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी आमच्याकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार ही जी त्रिमूर्ती आहेत. ते जागा वाटपासारख्या चर्चा वेळेवर करण्यासाठी अगदी सक्षम आहेत. इतरांसारखे प्रत्येक वेळेला पत्रकार परिषदा घेऊन बातम्या लिक करणे, असे काही करणार नाहीत.

"ताकदीप्रमाणे जागा मिळणार"

महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या तीनही पक्षाला त्यांच्या ताकदीप्रमाणे जागा मिळतील. विधानसभा निवडणुकीतील जागांचे वाटप लवकर होईल. जेणेकरून प्रत्येक पक्षाला आपल्या उमेदवारांची निश्चिती लवकर करता येईल, असा विश्वासही चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

पुढच्या आषाढी एकादशीला पूजा कोण करणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी कसलेल्या राजकारण्याप्रमाणे तेवढ्याच सडेतोडपणे उत्तर दिले. पुढच्या आषाढी एकादशीला महायुतीचे मुख्यमंत्री पांडुरंगाची पूजा करतील, असे उत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 PLAYOFF SCENARIO: सनरायझर्स हैदराबादचा विजय, पण गुजरात टायनट्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचले? 'बाय वन गेट वन' ऑफर

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नई सुपर किंग्सचे आव्हान संपले? SRHने विजयासह GT ला अंतिम ४ मध्ये पोहोचवले; १ जागा ३ स्पर्धक...

IPL 2026 Controversy : संजू सॅमसनने विजेच्या वेगाने बेल्स उडवल्या... OUT होताच हेनरिच क्लासन खवळला, अंगावर धावला Video

Gautam Adani: अमेरिकेत गौतम अदानींचा मोठा विजय! US मधील खटला कायमचा बंद; न्याय विभागाने आरोप मागे घेतले

Pune Council Seat Battle: पुणे विधान परिषद जागेसाठी राष्ट्रवादी-भाजपमध्ये रस्सीखेच

SCROLL FOR NEXT