Uddhav Thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

Uddhav Thackeray : आताच कामाला लागा. पाऊस आहे म्हणून उसंत घेऊ नका; जनतेपर्यंत पोहोचा

‘विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीबरोबर एकत्रच लढायच्या आहेत त्यासाठी आताच कामाला लागा. पाऊस आहे म्हणून उसंत घेऊ नका; जनतेपर्यंत पोहोचा,’

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

मुंबई - ‘विधानसभा निवडणुका या महाविकास आघाडीबरोबर एकत्रच लढायच्या आहेत त्यासाठी आताच कामाला लागा. पाऊस आहे म्हणून उसंत घेऊ नका; जनतेपर्यंत पोहोचा,’ असे निर्देश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिले.

पक्ष आणि चिन्ह नसतानाही पक्षाने चांगली भरारी घेतली असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिवसेना भवन येथे पक्षाचे नेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक बोलाविली होती. निवडणुकीतील विजयाबरोबरच ज्या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांचा पराभव झाला तेथील कारणे त्यांनी यावेळी जाणून घेतली. ठाकरे म्हणाले, ‘महाविकास आघाडी म्हणून लढताना पक्षाला मोठा विजय मिळाला नसला तरी तो समाधानकारक आहे. आपल्याकडे पक्ष आणि चिन्ह नसतानाही आपण ही निवडणूक लढलो.’

शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महाविकास आघाडी एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढेल. राज्यातील विधानसभेच्या १८० ते १८५ जागा जिंकू

- संजय राऊत, खासदार

राज्याचा दौरा करणार

विधानसभेची आगामी निवडणूक आघाडी म्हणूनच लढायची आहे. या निवडणुकीत भाजपला महाराष्ट्रातून हद्दपार करायचे आहे त्यासाठी कामाला लागा, असे आवाहन करतानाच ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिकालाच विराजमान करायचे आहे याचा पुनरुच्चारही केला. शिवसेनेच्या वर्धापनदिनानंतर मी स्वत: महाराष्ट्रात फिरणार आहे, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

SCROLL FOR NEXT