Ajit pawar sakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar : जागा वाटपाचा तिढा अंशतः सुटला

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अंशतः सुटलेला आहे. जागावाटप झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची सविस्तर माहिती देऊ.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अंशतः सुटलेला आहे. जागावाटप झाल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन, याबाबतची सविस्तर माहिती देऊ. काही इच्छुक उमेदवार वेगवेगळ्या पक्षात प्रवेश करत असतात, परंतु अंतिम निर्णय निवडणुकीपूर्वी घेतला जाईल, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या विविध प्रकल्पांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन पिंपळे गुरव येथील नटसम्राट निळू फुले रंगमंदिरातून ऑनलाइन झाले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले, ‘राज्यात सर्वत्र नवरात्री उत्सव सुरू आहे, आणि या उत्सवात स्त्री शक्तीचा जागर होतो. भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे प्रतीक मानले जाते. तिची विविध रूपे महाकाली व दुर्गामातेच्या रूपात दिसतात.

राष्ट्रनिर्माणामध्ये स्त्रियांचा मोलाचा वाटा आहे.’ महापालिकेने केलेल्या विकास कामांचा उल्लेख करत पवार म्हणाले, ‘मुळा नदीच्या एका बाजूस पिंपरी-चिंचवड आणि दुसऱ्या बाजूस पुणे महापालिका आहे. दोन्ही महापालिकांनी एकत्रित निविदा काढल्यास मुळा नदी काठ सुधार प्रकल्पाची कामे अधिक जलद आणि प्रभावीरीत्या होऊ शकतील.’

पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. या शहराची मतदारसंख्या वाढत असल्याने सर्वांसाठी सुविधा उपलब्ध करणे ही काळाची गरज असल्याचेही पवार यांनी या वेळी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Heavy Rain Hailstorms: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात गारपीट! वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस; 'या' भागांना अलर्ट

Mutha Canal Overflow : मांजरी परिसरात मुठा कालवा ओव्हर फ्लो झाल्याने रस्त्यावर व झोपड्यांमध्ये शिरले पाणी, वाहतूक कोंडीत अडकले प्रवासी

शेतकऱ्यांना उजनीचे सलग ८० दिवस पाणी! धरणाचे ९ दरवाजे उघडले; उन्हाळी आवर्तनासाठी लागणार १७ टीएमसी, धरण ५७ टक्के भरलेले, वाचा...

Bidkin News : बिडकीन हादरले! विहिरीत बुडून २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; मित्रांसमोरच घडली दुर्दैवी घटना

Pune Crime : गुंतवणूकदारांची फसवणूक; भाजपचा नेता शेखर चरेगावकरला अटक

SCROLL FOR NEXT