Vijay Vaddetivar Sakal
महाराष्ट्र बातम्या

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नाहीत : वडेट्टीवार

ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका असून तसा ठरावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, अशी राज्य सरकारची ठाम भूमिका असून तसा ठरावही मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. हा विषय महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही. येत्या १७ रोजा सर्वोच्च न्यायालयात असून तिथे बाजू मांडणार असल्याचे ओबीसी विकास मंत्री विजय वडेट्टीवार (VIjay Vaddetivar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (OBC Reservation And Election)

ते म्हणाले, ‘‘ओबीसींचा इम्पिरिकल डेटा कोणत्याही राज्याने गोळा केलेला नाही. केंद्र सरकार ओबीसी आरक्षणाबाबत महाराष्ट्राशी दुजाभाव करीत आहे. मध्य प्रदेशमध्ये ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण होताच केंद्र सरकार प्रतिज्ञापत्र सादर करते. केंद्राने चार महिन्यात डेटा गोळा करता येणे शक्य नसल्याचे न्यायालयाला सांगितले आहे. कोणत्याही राज्याने अजून ओबीसी डेटा गोळा केलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी केवळ महाराष्ट्राला दोषी धरता येणार नाही.’’

इम्पिरिकल डेटा तयार करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोग कामाला लागले आहे. त्यांना आवश्यक मदत करण्यात येत आहे. केंद्र सरकारने चार महिन्यात डेटा गोळा होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांना डेटा गोळा करण्यासाठी जो वेळ लागले, तो वेळ द्यावा, अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला आम्ही करणार असल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

माजी पंतप्रधानांच्या मुलासोबत व्हॉट्सॲपवर सायबर फ्रॉड; 7.8 कोटी रुपये अकाऊंटमधून गायब, अशा परिस्थितीत कसं सुरक्षित राहायचं? पाहा

Ambajogai Crime: अंबाजोगाईत धक्कादायक घटना! अभ्यासिकेतून परतणाऱ्या १२ वीच्या विद्यार्थ्यावर मध्यरात्री जीवघेणा हल्ला; जखमी अवस्थेत आईला शेवटचा फोन

Nanded: ॲपेतून डिझेल वाहतुकीचा धंदा; सुरक्षा नियमांची ऐशी तैशी !, इतरांचा जीव धोक्यात

Manoj Jarange : हैदराबाद गॅझेटचा प्रश्न मार्गी; कुणबी प्रमाणपत्रासाठी उद्यापासून अर्ज करा, जरांगेंचं आवाहन, नोंदी नसल्या तरी चिंता नाही

Fifa World Cup 2026: हे नाव लक्षात ठेवा, Jonathan David! पठ्ठ्याने ९६ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी केली बरोबरी, १९६६चा आणखी एक पराक्रम मोडला

SCROLL FOR NEXT