Akola Crime News Esakal
महाराष्ट्र बातम्या

Akola Crime News : 'सावकाराकडून ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न...'; व्हायरल व्हिडीओने महाराष्ट्रात खळबळ, वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

Akola Crime News : अकोल्यामध्ये शेतीचा ताबा देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी युवकाला सावकाराने ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

अकोल्यामध्ये शेतीचा ताबा देण्यास विरोध करणाऱ्या शेतकरी युवकाला सावकाराने ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासंबधीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर शेअर करत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी सेटलमेंट करू नका, असं म्हणत वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला आहे.

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सावकार दादागिरी करतानाचा एक व्हिडीओ देखील त्यांच्या सोशल मिडीयावरती शेअर केला आहे. अकोल्याच एका सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणारा तसेच मनाचा थरकाप उडवणारा हा प्रसंग असल्याचं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

काय लिहलं आहे वडेट्टीवार यांनी पोस्टमध्ये?

आपल्या सोशल मिडीया पोस्टमध्ये वडेट्टीवार लिहतात की, "सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न. राज्यातील कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणारा आणि मनाचा थरकाप उडवणारा प्रसंग."

"अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात असलेल्या मनब्दा या गावी एका अवैध सावकाराच्या गुंडाणे शेतकऱ्यावर प्राणघात हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. एवढ्यावरच हे गुंड थांबले नसून संबंधित शेतकऱ्याच्या शेतात जाऊन शेताचा ताबा घेण्याचासुद्धा प्रयत्न केला. शेतकरी आणि त्याच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न या गावगुंडातर्फे करण्यात आला. संबंधित शेतकऱ्याच्या म्हाताऱ्या वडीलाला व पत्नीलासुद्धा मारहाण करण्यात आली."

"महायुती सरकारच्या काळात अवैध सावकारीने पुन्हा डोके वर काढले असून ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न अवैध सावकारांकडून होत आहे. शेतकऱ्यांचा सूड घेणाऱ्या अवैध सावकारांवर सरकारने कडक कारवाई करावी. अपघात -ड्रग्ज प्रकरणातील आरोपी, गुंड, भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना छळणाऱ्या सावकारांसोबत तरी "सेटलमेंट" करू नये!", अशी पोस्ट वडेट्टीवार यांनी लिहली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bageshwar Dham Update : Video - बागेश्वर धामबद्दल मोठी बातमी, सर्व कार्यक्रम रद्द ; आता धीरेंद्र शास्त्रींनी केले ‘हे’ आवाहन!

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

एनटीपीसी प्रकल्पग्रस्त मिथूनची आत्महत्या! खासदार प्रणिती शिंदेंच्या समजुतीनंतर १२ तासांनंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतला ताब्यात, प्रणिती म्हणाल्या....

Pune News : एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'च्या घोषणेने वादाला तुटले तोंड

SCROLL FOR NEXT